Sambhajinagar Crime News : वाळूज ठाण्यासमोर हायव्होल्टेज ड्रामा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : वाळूज ठाण्यासमोर हायव्होल्टेज ड्रामा

तक्रार करू नये म्हणून पत्नीला बळजबरीने कारकडे ओढले; पोलिसांच्या सतर्कतेमुळे पतीचा डाव फसला

पुढारी वृत्तसेवा

High voltage drama in front of Waluj police station

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोर गुरुव-ारी (दि. २१) भरदिवसा एक धक्कादायक आणि नाट्यमय प्रकार घडला. कारमधून उतरताच एका २७ वर्षीय महिलेने पोलिस ठाण्याच्या दिशेने पळत सुटली. मात्र, तिच्या पाठोपाठ आलेल्या पतीने आणि इतर दोघांनी पाठलाग करून तिला काही अंतरावर पकडले आणि बळजबरीने ओढत नेत पुन्हा कारमध्ये बसविले.

पोलिस ठाण्यासमोर भरदिवसा घडलेला हा प्रकार पाहून तेथे उपस्थित पोलिसांनी तातडीने कारकडे धाव घेतली आणि चौकशी सुरू केली. या चौकशीत, पतीने केलेल्या मारहाणीची तक्रार पत्नीने पोलिस ठाण्यात देऊ नये, यासाठी तिला बाहेरच रोखल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज महानगर परिसरात राहणाऱ्या या २७वर्षीय महिलेला गुरुवारी तिच्या पतीने मारहाण केली होती. या मारहाणीनंतर रागाच्या भरात पत्नीने काहीतरी औषध प्राशन केले असा पतीला संशय आला. त्यामुळे तो इतर दोघांच्या मदतीने कारमधून तिला दवाखान्यात घेऊन जात होता.

उलटीचे बहाणे करून घेतली धाव

ही कार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोरून जात असताना, महिलेने आपल्याला उलटीचा त्रास होत असल्याचे सांगून गाडी थांबवायला लावली. कार थांबताच ती महिला खाली उतरली आणि थेट पोलिस ठाण्याच्या दिशेने पळू लागली. पत्नी आपल्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी जात असल्याचे लक्षात येताच, तिच्या पतीने व सोबतच्या दोघांनी तिचा पाठलाग केला आणि तिला कारकडे ओढत नेले. हा प्रकार समोर घडताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे आणि पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी कारकडे धाव घेत तात्काळ चौकशी केली.

मारहाणीची तक्रार करू नये म्हणूनच पत्नीला ठाण्यात जाण्यापासून बळजबरीने थांबविल्याची कबुली महिलेच्या पतीने पोलिसांना दिली. वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT