प्रातिनिधिक छायाचित्र   (File Photo)
छत्रपती संभाजीनगर

HSRP Update | हायसिक्युरिटी नंबर प्लेटला १५ ऑगस्टपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ

मुदत संपल्यानंतर वायुवेग पथक करणार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

High Security Number Plate Deadline Extended

छत्रपती संभाजीनगर : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आले आहे. याची मुदत ३० जून २०२५ होती. याला मुदतवाढ देण्यात आली असून आता वाहनधारकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत या नंबर प्लेट बसवून घेता येणार आहेत. दरम्यान मुदतवाढ संपल्यानंतर आरटीओ कार्यालयाचे वायुवेग पथक कारवाई करणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३० जून-२०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी) बसवून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यांत सुमारे ९५ हजार ०७३ वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नाव नोंदणी केली आहे. यापैकी ६० हजार १७७ वाहनांनाच या प्लेट बसवून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २०१९ पूर्वीची सुमारे ९ लाख ५० हजार वाहने आहेत. आजही जुन्या वाहनांची संख्या मोठी असल्याने याला १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरीत वाहनांना १५ ऑगस्ट पर्यंत या नंबर प्लेट बसवून घेण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर मात्र कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.

तिसऱ्यांदा मुदतवाढ

नंबर प्लेटसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीचे जिल्ह्यात सुमारे २४ ठिकाणांहून नंबर प्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. तरीही वाहनांची संख्या जास्त असल्याने ही मुतदवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत तिनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२५ त्यानंतर ३० जून २०२५ तर आता १५ ऑगस्ट २०२५ अशी तिसरी मुदत वाढ दिली आहे. आजही अनेक वाहनांना या प्लेट बसवायच्या आहेत. त्यामुळे केंद्राच्या संख्ये बरोबरच कामाचा वेग वाढवण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

मुदतीनंतर कारवाई

हाय सिक्युरीटी नंबर प्लेटसाठी १५ ऑगस्ट ही मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ तिसरी आहे. त्यानंतर मात्र आरटीओच्या वायुवेग पथकांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरटीओच्या वतीने देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT