नाथसागर धरण (Pudhari Photo)
छत्रपती संभाजीनगर

Nath Sagar Dam | पैठण तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस; नाथसागर धरण ८१ टक्के भरले

Paithan Heavy Rainfall | नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

Nath Sagar Dam Water Levels

पैठण : पैठण तालुक्यातील ग्रामीण भागासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सतत पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाथसागर (जायकवाडी) धरणातील पाणीसाठा आता ८१ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती धरण शाखेचे उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे.

तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये एकूण ३०२८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. सततच्या पावसामुळे शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपस्थितीवर परिणाम झाला आहे.

तालुक्यातील पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

पैठण शहर: ४०+२८६ मिमी

पिंपळवाडी: २३+२६४ मिमी

बिडकीन: ६२+३४५ मिमी

ढोलकीन: २७+२२९ मिमी

बालानगर: ३५+३३६ मिमी

नांदर: २३+३३६ मिमी

आडुळ: ४९+४०७ मिमी

पाचोड: ३८+३१० मिमी

लोहगाव: ३१+२८३ मिमी

विहामांडवा: २८+२३२ मिमी

शनिवारी नाथसागर धरणात १८,५८८ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील साठा ८५ टक्क्यांवर गेल्यास पाटबंधारे विभागाकडून जलपूजन करून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असून, प्रशासन आणि जलसंपदा विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT