शहरात दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस file photo
छत्रपती संभाजीनगर

Rain Update : शहरात दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस

शहरात मंगळवारनंतर बुधवारी (दि. २२) देखील दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

पुढारी वृत्तसेवा

Heavy rain in the city for the second consecutive day

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मंगळवारनंतर बुधवारी (दि. २२) देखील दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप सुरूच होती. तर दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. दिवसभर थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. सायंकाळपर्यंत पडेगावच्या एमजीएम वेध शाळेत ४५ मिमी तर चिकलठाणा वेधशाळेत १३.७मिमी पावसाची नोंद झाली होती.

शहरात १० जुलैपासून पावसाने अचानक आठवडाभर दडी मारली होती. त्यात जूनमध्येही तब्बल २० दिवस पाऊस गायब होता. त्यामुळे अजूनही शहरालागतच्या आटलेल्या बोअरला पाणी आलेले नाही. नागरिकांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराला मोठ्या पावसांची प्रतीक्षा आहे.

त्यात मागील दिवसांपासून शहरात पावसाचे पुर्नरागमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे चेहरे फुलले आहेत. रविवारी अचानक वातवरण बदलल्याने सोमवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. परंतु अजूनही म्हणावा तसा जोरदार पाऊस बरसलेला नाही.

शहरात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात दुपारी पडेगाव, भावसिंगपूरा, मिटमिटा, छावणी बेगमपुरा या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर सिडको, हडको भागातही सुमारे १५ ते २० मिनीटे दामदार सरी कोसळल्या. दिवसभर पावसाची कोसळधार सुरूच राहिली.

त्यामुळे दोनळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान चिकलठाणा वेध शाळेत १३.७ मिमी आणि पडेगाव येथील एमजीएम वेध शाळेत ४६ मिमी पावसाची नोंद झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT