Corporator Disqualification Case : नगरसेवक अपात्रता प्रकरणी आठ तक्रारींवर सुनावणी file photo
छत्रपती संभाजीनगर

Corporator Disqualification Case : नगरसेवक अपात्रता प्रकरणी आठ तक्रारींवर सुनावणी

सात प्रकरणांत २१, तर एका प्रकरणात २८ डिसेंबरची पुढील तारीख

पुढारी वृत्तसेवा

Hearing on eight complaints regarding the disqualification of municipal councillors

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या कारणांवरून नगरसेवकांच्या सदस्यत्व अपात्रतेसाठी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची सुनावणी महापालिकेत सुरू आहे. या प्रकरणांत सोमवारी (दि. १६) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर आठ तक्रारींवर सुनावणी झाली. मात्र, अंतिम निर्णयासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सात प्रकरणांत २१ डिसेंबर, तर विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्या प्रकरणात २८ डिसेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

दोनपेक्षा अधिक अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याच्या कारणांवरून महाराष्ट्र नगरसेवकांविरोधात महानगरपालिका अधिनियमातील कलम १० (१) (ड) अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ३८ तक्रारी असून, त्यापैकी २७ तक्रारींवर पहिल्या टप्प्यात सुनावणी झाली आहे. सोमवारी आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर आठ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

नगरसेवक फरजाना शेख गुलाम रसूल, मुन्शी भिकन शेख, पठाण मजहर पठाण अय्युब, विश्वनाथ स्वामी, मिर वाजिद अली आणि अशोक हिवराळे यांच्याविरोधात अतिक्रमण व अनधिकृत बांधकामासंदर्भात तक्रारी दाखल आहेत. तर दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या कारणावरून विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद आणि पठाण मजहर पठाण अय्युब यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे पठाण मजहर यांच्याविरोधात दोन्ही कारणांवरून तक्रारी दाखल आहेत. या सुनावणीनंतर सात प्रकरणांची पुढील सुनावणी २१ डिसेंबर, तर अब्दुल समीर साजिद यांच्या प्रकरणाची सुनावणी २८ डिसेंबर रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT