अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स बस, रिक्षाची समोरासमोर धडक file photo
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स बस, रिक्षाची समोरासमोर धडक

सलग तिसऱ्या दिवशी अपघात; दोघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

Head-on collision between a tourist bus and an auto-rickshaw in the Ajanta Ghat.

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाट पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला. फर्दापूर येथील घाटातील अरुंद व धोकादायक वळणावर रविवारी (दि.१०) सकाळी खासगी ट्रॅव्हल्स बस आणि लोडिंग रिक्षाची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात लोडिंग रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला असून त्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घाटातील अरुंद मार्गावर दोन्ही वाहने अडकल्याने तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली.

तन्वीर शेख रऊफ (वय ३०) व अरबाज शेख शकील (वय २७) (दोघे रा. वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

तन्वीर शेख व अरबाज शेख हे दो घेजण भंगार व्यवसायाच्या कामासाठी वाकोद येथून लोडिंग रिक्षा (एमएच १७टी ३५४३) ने सिल्लोडच्या दिशेने जात होते. रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फर्दापूर येथील अजिंठा घाटातील एका तीव्र व अरुंद वळ-णावर त्यांनी समोरील अवजड वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस (एमपी ६८ झेई ८८४४) सोबत त्यांची समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की लोडिंग रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. तर ट्रॅव्हल्स बसच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात तन्वीर शेख हा गंभीर जखमी झाला तर अरबाज शेख हा किरकोळ जखमी झाला.

घाटातील रस्ता आधीच अरुंद असल्याने अपघातानंतर काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पर्यटकांच्या खासगी गाड्या, एसटी बस, मालवाहू वाहने आणि ट्रॅव्हल्स बसेस घाटात खोळंबून राहिल्या. तासभरानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

अपघातांचा हॉटस्पॉट

विशेष म्हणजे अजिंठा घाटात सलग तिसऱ्या दिवशी अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवारी एसटी बस व ट्रकचा अपघात, शनिवारी कार-कंटेनर टेम्पोचा तिहेरी अपघात आणि आता रविवारी ट्रॅव्हल्स बस व लोडिंग रिक्षाची धडक अशा सलग घटनांमुळे घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT