त्याने चावी फिरवली अन् वाहन थेट विहिरीत कोसळले file photo
छत्रपती संभाजीनगर

त्याने चावी फिरवली अन् वाहन थेट विहिरीत कोसळले

सोयगाव तालुक्यातील घटना, दहा किंवटल गहू पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

He turned the key, and the vehicle plunged straight into the well

जरंडी, पुढारी वृत्तसेवा : गव्हाच्या पोत्यांनी भरलेले छोटा हत्ती पीकअप वाहन अज्ञाताने चावी फिरवून सुरू करत तेथून पळ काढला. काही कळण्यापुर्वीच हे वाहन रस्त्यालगत असलेल्या ४५ फूट विहिरीत कोसळल्याची घटना रविवारी (दि.५) दुपारी दोन वाजेच्या सुमारास सोयगाव तालुक्यातील कंकराळा गावाजवळ घडली.

सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. दहा किंवटल गव्हाचे पाण्याने नुकसान झाले. कंकराळा गावाजवळील रस्त्यावर उतारावर रविवारी दुपारी गव्हाचे लोडिंग वाहन उभे होते. सोयगावला जाणाऱ्या या वाहनात शेतकऱ्यांकडील गहू ठेवण्यात येणार होता.

यासाठी काही वेळ लागणार असल्याने चालक वाहनाला चावी तशीच ठेवून हँडब्रेक लावून वाहनापासून काही अंतरावर गेला. वाहनाजवळ कोणीही नसतांना अज्ञाताने हँडब्रेक काढत चावी फिरवून वाहन सुरू करून पळ काढला. काही कळण्यापुर्वीच वाहन रस्त्यालगत असलेल्या ४५ फूट विहिरीत कोसळले.

मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ विहिरीजवळ धावले. या विहिरीत ४० फूट पाणी होते. परिसरातील नागरिकांची यावेळी मोठी गर्दी झाली होती. विहिरीत पाणी असल्याने वाहन विहिरीबाहेर काढणे सर्वांना जिकरीचे झाले होते. ग्रामस्थ जीवन उबाळे यांनी पुढाकार घेत विहिरीत उतरून इतर ग्रामस्थांच्या मदतीने वाहन क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले.

दीड तासाच्या प्रयत्नांनतर वाहन विहिरीच्या बाहेर

विहिरीतील वाहन बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल दीड तासानंतर वाहन विहिरीबाहेर काढण्यात यश आले, परंतु वाहनातील गहू मात्र पाण्यात भिजला. विहिरीभोवती ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT