Har Ghar Tiranga : शहरात हर घर तिरंगाला प्रारंभ file photo
छत्रपती संभाजीनगर

Har Ghar Tiranga : शहरात हर घर तिरंगाला प्रारंभ

मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेकांनी घरांवर फडकवला राष्ट्रध्वज

पुढारी वृत्तसेवा

'Har Ghar Tiranga' campaign begins in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मागील काही वर्षांपासून देशभरात हर घर तिरंगा अभियान उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. यंदाही हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत असून, बुधवारी (दि.१२) ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सहकुटुंब स्वतःच्या निवासस्थानावर तिरंगा राष्ट्रध्वज अभियानाला सुरुवात केली.

फडकावत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा अभियान राबविण्यात सावे व त्यांच्या कुटुंबाने स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकावत शहरात या अभियानाला सुरुवात केली आहे.

राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती सन्मानाची भावना यातून जागृत करण्यात येत आहे. या अभियानाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने या हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे. आपल्या घरावर तिरंगा फडकावून राष्ट्राभिमानाची भावना व्यक्त करावी, असे आवाहन मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT