Half of the candidates absent from UPSC exam
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) रविवारी (दि.३०) सहाय्यक भविष्य निर्वाह निधी अधिकारी, लेखाधिकारी पदासाठी परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ परीक्षा केंद्रावरून १,२५३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेला उपस्थितीचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी होते.
यूपीएससीतर्फे ईपीएफओ - संयुक्त भरती परीक्षा रविवारी घेण्यात आली. शहरातील नऊ केंद्रांवर सकाळी ९. ३० ते ११. ३० या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी सकाळी आठ वाजेपासून विद्यार्थी परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर येत होते. तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. परी-क्षेसाठी छत्रपती संभाजीनगर शहर केंद्रावरून २,८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी १,२५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांनीही भेटी दिल्या. परी क्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्केही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. परीक्षेत २,८८० पैकी १,६२७ परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरहजेरी होती. परीक्षेनंतर परीक्षार्थी विद्यार्थी, पालकांमध्ये उपस्थितीची चर्चा होती. यूपीएससी परीक्षेत उपस्थितीचे प्रमाण अनेकदा कमी असते. आज झालेल्या परीक्षेत उपस्थितीचे प्रमाण ४३.५० टक्के होते. तर अनुपस्थितीचे प्रमाण ५६.५ एवढे होते.