Two-Wheelers Stolen : शहरातून अर्धाडझन दुचाकी लंपास; विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल File Photo
छत्रपती संभाजीनगर

Two-Wheelers Stolen : शहरातून अर्धाडझन दुचाकी लंपास; विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी अर्धाडझन दुचाकी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Half a dozen two-wheelers stolen from the city; cases registered at various police stations

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी अर्धाडझन दुचाकी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. सातारा परिसरातील ढवळापुरी येथे राहणारे शंकर कचरू पुंगळे (वय ४९) यांची दुचाकी (एमएच-२०-ईबी-६९३७) १० मे रोजी रात्री ७ ते ८.४५ वाजेच्या दरम्यान बीड बायपास परिसरातील हिवाळे लॉन्ससमोरून चोरट्यांनी - चोरून नेली.

नारेगावातील भाजीमंडी परिसरात राहणारे रणजीत परमानंद सिंग (वय ३७, मूळ रा. कोरंडा, ता. जि. भागलपूर, बिहार) यांची दुचाकी (एमएच-२०-एजी-७६६०) २९ मार्च ते ३ मे दरम्यान नारेगाव परिसरातील लिना कंपनीजवळील मोकळ्या मैदानातून लंपास करण्यात आली.

माणिक नगर, नारेगाव येथील सोमिनाथ नामदेव मिसाळ (वय ४०) यांची दुचाकी (एमएच-२०-डीवाय-३९५४) ४ ते ५ मे दरम्यान घरासमोरून चोरीस गेली. जाधववाडी परिसरातील बळीराम रतन राठोड (वय ५५, मूळ रा. भीमानाईक तांडा, ता. अंबड, जि. जालना) यांची दुचाकी (एम एच २१-बी के-०९५६) २६ ते २७ एप्रिल दरम्यान घरासमोरून चोरट्यांनी लंपास केली.

हर्मूल परिसरातील यासीननगर येथे राहणारे शेख आदील शेख आसिफ (वय ५२) यांची दुचाकी (एमएच-२०-एचए-११३५) ४ मे रोजी पहाटे २ ते सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घरासमोरून चोरीस गेली. तर स्वास्तिकनगर, साजापूर येथील मंजीतराव यादवराव खंबाट (वय ४२, रा. गट क्र. ३८) यांची दुचाकी (एमएच-२०-डीडब्ल्यू-८०३०) १४ ते १५ मे दरम्यान घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी अनुक्रमे सातारा, एमआयडीसी सिडको, हर्मूल आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT