Narcotic pills seized : मुकुंदवाडीत 'बटन गोळ्या' विकणारा सराईत गजाआड file photo
छत्रपती संभाजीनगर

Narcotic pills seized : मुकुंदवाडीत 'बटन गोळ्या' विकणारा सराईत गजाआड

एनडीपीएस पथकाची कारवाई; १५९ नशेच्या गोळ्या जप्त

पुढारी वृत्तसेवा

Habitual offender selling 'button pills' arrested in Mukundwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी येथील अहिल्यानगर परिसरात रेल्वेपटरीजवळ नशेच्या 'बटन गोळ्यांची' विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एनडीपीएस) बेड्या ठोकल्या. गणेश छगन मुन्ने (२९, रा. अहिल्यानगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून १५९ नशेच्या गोळ्या जप्त केल्याची माहिती सहायक आयुक्त मजहर सय्यद यांनी दिली.

आजवर अनेक ड्रग्ज सप्लायर्स, पेडलर्सच्या टोळ्या गजाआड झाल्या आहेत. बुधवारी (दि. २९) पोलिस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे आणि त्यांच्या पथकाला मुकुंदवाडी रेल्वेपटरीजवळ गणेश मुन्ने हा नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडे नशेच्या १५९ गोळ्या आणि दोन मोबाईल सापडले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई प्रभारी पोलिस आयुक्त पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, हवालदार भाऊसिंग चव्हाण, नारायण पायघन, अंमलदार सतीश जाधव, छाया लांडगे, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे आणि चालक विठ्ठल पवार यांच्या पथकाने केली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि नशेचा बाजार

आरोपी गणेश मुन्ने हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी जीवघेणा हल्ला, घरफोडी, चोरी आणि हाणामारीसारखे आठपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याआधी त्याला गांजा विक्री करतानाही पकडण्यात आले होते. गांजा विक्रीचा धंदा बंद पडल्यानंतर त्याने आता नशेच्या बटन गोळ्यांच्या विक्रीचा काळा धंदा सुरू केला होता. विशेष म्हणजे, नशेखोरांना तो एक गोळी १०० ते १५० रुपयांना विकत होता. चौकशीत त्याने या गोळ्या मुंबईतील अंधेरी येथून आणल्याची कबुली दिली असून, पोलिस आता मुख्य पुरवठादाराच्या मागावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT