Great job opportunities for students in the manufacturing sector
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : येथील औद्योगिक वसाहतीत मोठमोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. लवकरच त्यांचे प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. अशा या उत्पादन क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे आपले कौशल्य विकसित करून विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन करण्यात आले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीतर्फे आयोजिय सुपरनोव्हा स्पार्क द फ्युचर या दोन दिवसीय तांत्रिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.१९) रुक्मिणी सभागृह येथे संपन्न झाला.
यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, डॉ. हेमल देसाई, आशिष शाह, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे सचिव मिहीर सौंदळगेकर, कौस्तुभ थानावाला तर कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. एच.एच. शिंदे, संचालिका डॉ. परमिंदर कौर, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते. स्पार्क द फ्युचरच्या चित्रफितीचे मान्यवरांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. परमिंदर कौर यांनी केले. सूत्रसंचालन अवनी भायेकर आणि गाझी हानिया या विद्यार्थिनिंनी केले.