Gore Banjara community march on Tehsil
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद गॅझेटनुसार राज्यातील गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी कन्नड तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजाच्यावतीने शुक्रवारी (दि. १९) भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने गोर बंजारा समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मोर्चाची सुरुवात शहरातील गिरणी ग्राऊंड येथून झाली. हिवरखेडा नाका, पिशोर नाका, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक मार्गे मोर्चा ङ्गङ्घएकच मिशन एसटी आरक्षण, एकच लाल सेवालाल, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाहीङ्खङ्ग अशा गगनभेदी घोषणा देत तहसील कार्यालयासमोर धडकला.
तहसील कार्यालयासमोर पोहोचताच समाजाच्या महंतांच्या हस्ते व्यासपीठावरील महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या सभेत व्यासपीठावरील महंत व युवतींनी मनोगत व्यक्त करत बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्या, तसेच सी.पी. बेरार गॅझेट तातडीने लागू करा, अशी मागणी केली.
तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी समाजाच्या महंत व युवतींच्या हस्ते मागणीचे निवेदन स्वीकारले व ङ्गङ्घहे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठवतो, फ्फअसे आश्वासन दिले. यावेळी पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या भव्य एल्गार मोर्चात गोर बंजारा समाजाच्या महिलांची संख्या लक्षणीय होती. विशेष म्हणजे बहुतांश महिलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभाग नोंदविला. त्यांनी मोर्चादरम्यान पारंपरिक नृत्य सादर केले. तरुणांनीही हलकीच्या तालावर हातात संत सेवालाल महाराजांचा पांढरा ध्वज घेऊन नृत्य करत मोर्चाला उत्साहपूर्ण स्वरूप दिले.
महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज, ऋपिकेश चव्हाण, वीरा राठोड, आकांक्षा चव्हाण आदींनी मनोगतातून शासनाला इशारा देत म्हटले की, ङ्गङ्घजर येत्या महिनाभरात मराठा समाजाप्रमाणेच बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू केले नाही, तर मुंबईतील आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढण्यात येईल.