पैठण : पैठण तालुक्यासह नाथसागर धरण परिसरात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी धरणातून गोदावरी नदीत १८ हजार ८६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पैठण तालुक्यातील विविध महसूल मंडळासह नाथसागर धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नाथसागर धरणात २० हजारहून अधिक क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रणात आणण्यासाठी नाथसागर धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात असून या धरणातून गोदावरी नदीत १८ हजार ८६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गेल्या अडीच महिन्यांपासून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.