Ghati Hospital The document verification for those posts will begin from Wednesday
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
घाटीतील वर्ग ४ कर्मचारी यांची ३५७ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया तांत्रिक कारणामुळे दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. ही तपासणी प्रक्रिया सोमवार, दि. १९ जानेवारी ऐवजी आता २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तारखेतील हा बदल तपासणी प्रक्रिया जास्त पारदर्शक व सुरळीत होण्यासाठी करण्यात आल्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील चतुर्थ श्रेणीतील ३५७ रिक्तपदांच्या भरतीसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
यापरीक्षेच्या निकालाअंती निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी १९ जानेव ारीपासून केली जाणार होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे या तारखेची कागदपत्रे तपासणी २७ जानेवारीला होईल. तर २० जानेवारीची कागदपत्रे तपासणी प्रक्रिया २८ जानेवारीला होईल.
इतर सर्व कार्यवाही ही यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार ठरलेल्या वेळेनुसार व तारखेलाच होईल. १९ व २० जानेवारी २०२६ चा तारखेतील बदल हा टी सी एस कंपनीकडून याबाबतची मदत घेण्यासाठी आणि ही प्रक्रिया जास्त पारदर्शक व सुरळीत होण्यासाठी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन
याबाबत उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी प्रत्यक्ष प्रशासनाशी संपर्क साधावा. कोणत्याही बाहेरील व्यक्तींशी संपर्क करू नये. संस्थेतील प्रशासकीय यंत्रणा व नेमलेली समिती वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला या प्रक्रियेत हस्तक्षेप करता येणार नाही व तसे आढळून आल्यास त्या विरुद्ध कायदेशीर गंभीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिला आहे.