Ghati Hospital renovation
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : वारंवार तुंबणारे स्वच्छतागृह, तुटलेले दारे-खिडक्या, फुटलेल्या फरशा आणि काळवंडलेल्या भिती अशा अनेक असुविधांच्या वेदनांनी त्रस्त घाटी प्रसूती विभागाचे रूपडे आता पालटत आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या पुढाकाराने यावर नूतनीकरणाचे उपचार सुरू असून, १५ ऑगस्टपासून अत्यावत वॉर्ड रुग्णसेवेसाठी खुला केला जाणार आहे.
मराठवाड्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयातील अनेक वॉर्डाचा मागील दीड वर्षात कायापालट झाला आहे. यात आता खीरोग आणि प्रसूती विभागाच्या वॉर्ड क्रमांक २७चाही समावेश होणार आहे. प्रसूती विभागात दररोज १००हून अधिक गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. त्यापैकी ५० ते ६० बाळांना जन्म देणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या प्रसूती विभागातील वॉर्ड क्रमांक २७ अनेक वर्षांपासून विविध असुविधांच्या वेदनांनी विव्हळत होते.
आता या दुखण्यापासून लवकरच मुक्ती मिळणार आहे. चार महिन्यांपूर्वी अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या वॉर्डाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. हे काम अंतिम टप्यात आल्याने १५ ऑगस्ट रोजी प्रशासनाकडून उद्घाटन करण्याचे नियोजन सुरू आहे. यादृष्टीने अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी कामांची पाहणी करत सूचना दिल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता जोशी, विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली कुलकणी, डॉ. प्रशांत भिंगारे उपस्थित होते.
असुविधा, समस्यांवर नूतनीकरणाचा उपाय स्त्री रोग व प्रसूती विभागात दररोज ५० ते ६० गरोदर महिलांची प्रसूती होते. त्या तुलनेत अपुरे बेड आणि वॉर्डात अनेक समस्या होत्या. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यामुळे आता प्रसूती विभागाला वॉर्ड १३ मिळाला असून, वॉर्ड २७ चेही नूतनीकरण सुरू आहे.-डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, प्रसूती विभाग.
मोफत उपचारासोबतच चांगल्या सुविधा घाटी रुग्णालयातील सर्वात महत्त्वाचा असा स्त्रीरोग व प्रसूती विभाग आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक गर-ोदर महिलेला आणि मातांना विनामूल्य उपचारासोबतच चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी वॉर्ड २७अद्ययावत केला जात आहे. १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन केले जाईल.डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी.