Ghati Hospital : अधिष्ठातांच्या तंबीनंतर अस्वच्छ वॉर्ड खोल्या 'चकाचक' File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ghati Hospital : अधिष्ठातांच्या तंबीनंतर अस्वच्छ वॉर्ड खोल्या 'चकाचक'

अस्ताव्यस्त चादरी, उपकरणांची सुस्थितीत मांडणी; कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसह शिस्त पाळण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Ghati Hospital Inspection by Dean Dr. Shivaji Sukre

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वॉर्डात धुळीने माखलेल्या चादरी, अस्ताव्यस्त कोंबलेले बेडशीट आणि उपकरणे अडगळीत पडल्याचे बघून शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे चांगलेच भडकले होते. त्यांनी तंबी दिल्याने शनिवारी (दि. २) सकाळीच यंत्रणा कामाला लागली. वॉर्डासह खोल्यांची स्वच्छता करण्यात आली. चादरी, बेडशीट नीट लावून उपकरणेही सुस्थितीत ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

घाटीत रुग्णांना विनामूल्य औषधोपचारासोबतच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुक्रे नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. त्यांच्यामुळेच अनेक वॉर्डाचा कायापालट होऊन अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपचार साहित्यही उपलब्ध झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी घाटीच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात स्तनपान जनजागृती कार्यक्रमानंतर डॉ. सुक्रे यांनी वॉर्ड क्रमांक २६ मध्ये पाहणी केली.

यात वॉर्ड खोल्यांमध्ये धुळीने माखलेल्या असंख्य चादरी, बेडशीटचे गठे अस्ताव्यस्त कोंबलेले आणि उपकरणे, स्ट्रेचरही अडगळीत पडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अधिष्ठातांनी संताप व्यक्त करत तंबी दिल्याने कर्मचाऱ्यांनी साफसफाई करत खोल्याही धुवून काढल्या. बेडशीट, चादरीचे व्यवस्थित गड्ढे बांधून ठेवले. उपकरणेही सुस्थितीत ठेवण्यात आले. हे बघून वॉर्डात उपचारासाठी दाखल रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हास्य उमटले.

कामचुकार, बेशिस्त कर्मचाऱ्यांची खैर नाही

घाटी हजारो रुग्णांसाठी आधारवड आहे. मात्र, येथील काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे अस्वच्छता होते. अशाच कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाचे लक्ष असणार आहे. कारवाईची वेळ येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांना नीट कामे करण्याची तंबी देण्यात आली आहे.

शिस्त आणि स्वच्छतेवर भर

इतरही वॉर्डात अशीच स्वच्छता ठेवून कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळावी, रुग्णांची गैरसोय होणार नाही. याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर विभागप्रमुखासंह आमचे बारीक लक्ष असणार आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT