Gas Black Marketing : गॅसचा काळाबाजार, ७६ सिलिंडर जप्त  file photo
छत्रपती संभाजीनगर

Gas Black Marketing : गॅसचा काळाबाजार, ७६ सिलिंडर जप्त

पुरवठा विभागाच्या पथकाने बुधवारी गॅस सिलिंडरच्या काळ्याबाजारा विरोधात दोन ठिकाणी कारवाई करून ७६ गॅस सिलिंडर जप्त केले.

पुढारी वृत्तसेवा

Gas Black Marketing: 76 Cylinders Seized

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुरवठा विभागाच्या पथकाने बुधवारी गॅस सिलिंडरच्या काळ्याबाजारा विरोधात दोन ठिकाणी कारवाई करून ७६ गॅस सिलिंडर जप्त केले. यामध्ये शहरातील शहानूरमिया दर्गा परिसरात एकाच ठिकाणी ६९ सिलिंडर जप्त करण्यात आले, तर उर्वरित ७ सिलिंडर हे ग्रामीण तहसीलच्या पथकाने जप्त केली.

पुरवठा विभागाच्या पथकांकडून शहरातील हॉटेल्सची तपासणी करण्यात येत आहे. याअंतर्गत हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्यास ते जप्त करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

बुधवारी शहरात ५१ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये शहानूरमिया दर्गाजवळ शेख मुख्तार शेख उस्मान या व्यक्तीकडे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अवैध साठा आढळून आला.

व्यावसायिक गॅस भरलेले सिलिंडर ५ सिलिंडर, व्यावसायिक रिकामे ४० सिलिंडर आणि घरगुती गॅसचे २४ रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले. यासोबतच ग्रामीण तहसीलच्या हद्दीत एका ठिकाणी ७ घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याचे आढळल्याने तेळी जप्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT