Sambhajinagar News File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : गरवारे स्टेडियमच्या इनडोअर हॉलचे रूपडे पालटणार

६५ लाखांच्या अत्याधुनिकीकरणाला सर्वसाधारण सभेची मंजुरी : क्रीडा सुविधांसोबत संरक्षण भिंतीचीही मागणी

पुढारी वृत्तसेवा

Garware Stadium's indoor hall set for a makeover

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको एन-६ येथील महापालिकेच्या गरवारे स्टेडियममधील वर्षानुवर्षे वापराविना असलेल्या इनडोअर हॉलचे आता अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. हॉलच्या विकासासाठी ६५ लाख १० हजार रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मंगळवारी (दि.२५) सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. त्यामुळे हॉल पुन्हा क्रीडा उपक्रमांसाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गरवारे स्टेडियममधील इनडोअर हॉलमध्ये विविध साहित्य ठेवण्यात आल्याने त्याचा क्रीडा उपक्रमांसाठी वापर होत नव्हता. आयुक्त अमोल येडगे यांनी स्टेडियमच्या संभाजीनगर महानगरपालिका पाहणीदरम्यान हॉलची पाहणी केली होती.

त्यावेळी क्रीडा संघटना आणि खेळाडूंनी हॉलचे अत्याधुनिकीकरण करून तो क्रीडाप्रेमींसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने विकासाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडला. या प्रस्तावावरील चर्चेत शिवाजी दांडगे यांनी स्टेडियमच्या दुरवस्थेकडे सभेचे लक्ष वेधले. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, भंगार वाहने आणि पाइप पडून असल्याने मैदानाचा वापर करण्यास अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्यांवरही खेळाडूंना खेळता येत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच स्टेडियमला संरक्षण भिंत नसल्याने रात्रीच्या वेळी काही तरुणांकडून परिसराचा दारू पिण्यासाठी आडोसा म्हणून वापर केला जात असल्याचा मुद्दा सभेत मांडण्यात आला. प्रकाशझोतात क्रिकेट सामने सुरू असताना परिसरात मोठी गर्दी होते.

त्यामुळे गैरप्रकारांसोबतच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता सदस्यांनी व्यक्त केली. स्टेडियमला संरक्षण भिंत उभारण्याची मागणीही करण्यात आली. या प्रस्तावावर महेश माळवदकर, राजगौरव वानखेडे, पदमसिंग राजपूत, अजहर पठाण समीर बिल्डर आणि मतीन शेख यांन सहभाग घेतला. चर्चेनंतर महापौर समी राजूरकर यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याच जाहीर केले.

खेळाडूंना मिळणार अतिरिक्त सुविधा

६५ लाख १० हजार रुपये खर्चुन इनडोअर अत्याधुनिकीकरण हॉलचे करण्यात येणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ बंद असलेली ही जागा सराव, प्रशिक्षण आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी उपलब्ध होणार असून, शहरातील खेळाडूंना आणखी एक सुविधा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT