International Yoga Day : घंटागाडी कर्मचाऱ्यांना योगातून आरोग्य, प्रशिक्षणातून स्वच्छतेचा संदेश file photo
छत्रपती संभाजीनगर

International Yoga Day : घंटागाडी कर्मचाऱ्यांना योगातून आरोग्य, प्रशिक्षणातून स्वच्छतेचा संदेश

जागतिक योग दिनानिमित्त विशेष शिबीर, चालक व हेल्परना योग

पुढारी वृत्तसेवा

Garbage collection vehicle staff: Health through yoga, message of cleanliness through training

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जागतिक योग दिनानिमित्त महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील घंटागाडी चालक आणि हेल्पर कर्मचाऱ्यांसाठी रविवारी (दि. २१) विशेष योग व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. महापौर समीर राजुरकर, आयुक्त अमोल येडगे आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आयईसी पथकाने हा उपक्रम राबविला.

शहरातील घंटागाडी चालक आणि हसूल, रामानगर, कांचनवाडी, सलिम अली परिसर व सेंट्रल नाका येथील कचरा ट्रान्सफर स्टेशन परिसरात योग शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नियमित योगाभ्यासाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, तणावमुक्त जीवनशैली तसेच कामातील कार्यक्षमता वाढविण्यात योगाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी दिवस रात्र कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कर्मचाऱ्यांनी विविध योगासने आणि व्यायाम प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या योग सत्रासोबतच घंटागाडी चालक आणि हेल्पर यांना वाहन सुरक्षितपणे चालविणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि कचरा संकलनाची योग्य पद्धत याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक घरातून निर्माण होणारा ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनिटरी कचरा स्रोतस्तरावरच वर्गीकृत करून संकलित करण्याचे महत्त्वही यावेळी पटवून देण्यात आले.

निरोगी कर्मचारी - स्वच्छ शहर

निरोगी कर्मचारी - स्वच्छ शहर हा संदेश केंद्रस्थानी ठेवत योग, आरोग्य आणि स्वच्छता यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्याबरोबरच शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT