भरदिवसा वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Mangalsutra Theft : मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ ! जिन्सी, मुकुंदवाडीत दोघींचे दागिने ओरबाडले

शहरात महिलांना टार्गेट करून अंगावरील दागिने ओरबाडून नेणाऱ्या दुचाकीस्वार टोळ्यांचा धुमाकूळ सुरूच

पुढारी वृत्तसेवा

Gang of mangalsutra thieves! Jinsi, Mukundwadi: Two women's jewellery gets scratched

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात महिलांना टार्गेट करून अंगावरील दागिने ओरबाडून नेणाऱ्या दुचाकीस्वार टोळ्यांचा धुमाकूळ सुरूच असून, जिन्सी आणि मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना १७ आणि १८ जुलै सकाळी आणि रात्री घडल्या.

मैत्रिणीसोबत पायी जाणाऱ्या वृद्धेला लुटले पहिली घटना जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. फिर्यादी विजया ओमप्रकाश सोमबानी (७५, रा. श्रीनाथनगर) या त्यांच्या मैत्रिणीसोबत १८ जुलै रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास श्रीनाथनगर येथील संतपुरे हॉस्पिटलजवळील गार्डनजवळून पायी जात होत्या.

त्यावेळी एका चोरट्याने अचानक येऊन विजया यांच्या गळ्यातील ८ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल हिसकावून नेले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मनोज उईके करत आहेत.

घरासमोर उभ्या असलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

दुसरी घटना मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी नगरात घडली. फिर्यादी मीना देवचंद परदेशी (४०, रा. गल्ली नं. १२, जयभवानीनगर) या १७जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरासमोर उभ्या होत्या. अंधाराचा फायदा घेत अचानक आलेल्या एका भामट्याने मीना यांच्या गळ्यातील दीड ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. मीना यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल वैद्य तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT