Gang involved in teacher's death case arrested at midnight and granted bail in the morning
छत्रपती संभाजीनगर / खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीत निष्पाप शिक्षक सुरेश बोरसे यांचा बुधवारी (दि. १०) रात्री मृत्यू झाला होता. या संतापजनक घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना रात्री अटक केली. मात्र, गंभीर कलमे न लावल्याने, शुक्रवारी (दि. १२) या आरोपींना खुलताबाद न्यायालयातून तत्काळ जामीन मिळाला. पोलिसांच्या या एकंदर संशयास्पद भूमिकेमुळे आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रवींद्र रखमाजी आवारे (३४), ओंकार बाबूराव चौधरी (२४), बाळू विश्वनाथ डमाळे (४२, सर्व रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) आणि सोपान अशोक चोथे (२७, रा. नालगाव, ता. वैजापूर) अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील काही आरोपींवर वाळू तस्करी, प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.
अधिक माहितीनुसार, घटनेच्या दिवशी वेरूळ येथे खासगी तपासासाठी गेलेले उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मिक बणगे यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला. घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत. तरीही गुन्हा दाखल करताना अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी टोळक्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. शिक्षकाचा बळी जाऊनही आरोपींवर गंभीर गुन्हा न नोंदवता केवळ जुजबी कलमे लावून त्यांना मोकाट सोडण्यात आल्याचा आरोप वेरूळ परिसरातील नागरिक करत आहेत.
ते पोलिस अद्याप अज्ञातच घटनेच्या वेळी उपस्थित असलेले वैजापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि अंमलदार हे सध्या पोलिसांच्या लेखी अज्ञातच आहेत. मृत बोरसे यांच्या पत्नीच्या फिर्यादीत पोलिसांचा उल्लेख आणि व्हिडिओ पुरावा असतानाही त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मुलीला म्हणाला तुमच्यावरही कारवाई करू बोरसे यांना स्कार्पिओमध्ये डांबुन घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांची मुलगी वाहनसमोर आडवी होऊन, माझ्या वडिलांना कुठे घेऊन जाता? अशी विचारणा केली. त्यावर पांढरा शर्ट घातलेला एकजण आम्ही पोलिस आहोत. या इसमाने आमच्या कामात दखल दिली म्हणून आम्ही त्यांना घेऊन चाललो. तुम्हीपण बाजूला व्हा, नाहीतर तुमच्यावरही सरकारी कामात अडथळा केला म्हणून कारवाई करू असा उल्लेख बोरसे यांच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यात आहे.
अपर पोलिस अधीक्षक संपर्काबाहेर ; एलसीबीचे हात वर एका शिक्षकाचा पोलिसांच्या आणि टोळक्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडल्यानंतर आरोपींबाबत बोलण्यास एकही पोलिस अधिकारी समोर येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी संपर्काबाहेर आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत वरिष्ठांकडे बोट दाखवून नामानिराळे झाले. त्यामुळे आरोपींबाबतची माहिती माध्यमांपासून लपवाछपवी करण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: वेरूळ येथील बेदम मारहाणीच्या घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्ह्याची नोंद केली. मात्र यात पोलिस सहभागी असल्याचे सर्व पुरावे असतानाही थेट संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल का केले नाही ? पोलिस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ? असा सवाल शिवसेना उबाठाचे नेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि.१२) माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
आ. दानवे म्हणाले, शिक्षकाच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आणि भयावह असून, पोलिसी अत्याचार कसा असतो हे दाखवणारा हा प्रकार आहे. या शिक्षकाने फक्त इतक्या रात्री कोणाकडे आणि कशासाठी आला ? असा प्रश्न पोलिसांना विचारला. तेव्हा पोलिसांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिक्षकाला बेदम मारहाण केली.
यात शिक्षकाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जाते. मात्र तो झटका त्यांच्या मारहाणीमुळेच आला असल्याचा दावा दानवे यांनी केला. स्थानिक पोलिस हे या प्रकरणात गुंतलेल्या वैजापूरचे पोलिस अधिकारी नागरगोजे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरगोजे आणि इतर अंमलदार हे घटनास्थळी आले असल्याची नोंद देखील आहे. तरीही अज्ञात इसमांवर गुन्हा का दाखल करण्यात आला? असा सवाल आ. दानवे यांनी उपस्थित केला.
पोलिस निरीक्षकांसोबत आरोपीचा फोटो आ. दानवेंनी केला ट्वीट
शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या गुंडाला पोलिस अधिकारी पेढे भरवतानाचा फोटो द्विट करत आ. अंबादास दानवे यांनी है अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी हा एक नंबर म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), असं असताना अनोळखी गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे, अन्यथा गाठ आमच्याशी आहे., असेही म्हटले आहे.
'तो' फोटो वर्षभरापूर्वीचा एक वर्षापूर्वी मी पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालो तेव्हाचा फोटो To polite gitimates Hota colate Piplice Bell play are go त्यामध्ये संबंधित व्यक्तीचाही समावेश होता. त्यावेळेस आणि आताही संबंधित व्यक्तीवर कुठलाही अवैध वाळू वाहतूक संदर्भातला गुन्हा नोंद नाही. तसेच सदर व्यक्ती आरोपी असल्याची कोणतीही माहिती त्यावेळी मला नव्हती. त्यामुळे त्या भेटीचा कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक किंवा अन्य संबंधाशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत मी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थितीची माहिती दिली आहे, त्यांनीही आमची तुमच्या विरोधात कुठली तक्रार नाही याबाबत पोलिस अधीक्षकांना मी सांगितले आहे.- सत्यजित ताईतवाले, पोलिस निरीक्षक