Government Hospital OPD file photo
छत्रपती संभाजीनगर

Government hospital inspection : जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर आता 'पालक अधिकाऱ्यां'चा वॉच !

रुग्णसेवा ते औषधीपर्यंत : सरकारी रुग्णालयांची होणार नियमित तपासणी

पुढारी वृत्तसेवा

From patient care to medicine: Government hospitals will be regularly inspected

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वरिष्ठ वर्ग-१ अधिकाऱ्यांची 'पालक अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी सरकारी रुग्णालयांना भेटी देऊन ठरवून दिलेल्या तपासणी सूचीनुसार (चेकलिस्ट) पाहणी करून आढळणाऱ्या त्रुटीचा रिपोर्ट वरिष्ठांना सादर करणार आहेत.

यासंबंधी उपसंचालक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्हा व महानगरपालिका स्तरावरील शहरी आरोग्य सेवाअंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, महिला रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि हेल्थ अँड वेलनेस सेंटर, आरोग्य केंद्रांची नियमित पाहणी करणार आहेत.

या विशेष पाहणी मोहिमेदरम्यान रुग्णालयांतील इमारतींची दुरुस्ती, स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा, रुग्णांना मिळणारी ओपीडी, आयपीडी, प्रसूती कक्ष, ऑपरेशन थिएटर, आयसीयू आणि प्रयोगशाळा यासह औषधांचा साठा, वैद्यकीय उपकरणांची कार्यस्थिती, अग्निसुरक्षा व्यवस्था, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि सुरक्षा व्यवस्था आमि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा दर्जा तपासणी करतील.

दरमहा पाहणी अन् राज्यस्तरावर आढावा

नियुक्त केलेले पालक अधिकारी दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांना सोपवलेल्या जिल्ह्यांचा दौरा करतील. प्रत्येक पाहणीनंतर रुग्णालयांतील त्रुटी आणि त्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर करतील. त्यानुसार राज्य पातळीवरून थेट आढावा घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT