Knife attack : वाढदिवसाची पार्टी न दिल्याने मित्रावर चाकूहल्ला file photo
छत्रपती संभाजीनगर

Knife attack : वाढदिवसाची पार्टी न दिल्याने मित्रावर चाकूहल्ला

ही घटना शनिवारी (दि.३) दुपारी फाजलपुरा भागात घडली.

पुढारी वृत्तसेवा

Friend stabbed for not giving birthday party

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलाच्या वाढदिवसाची पार्टी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाने मित्राच्या घरात घुसून त्याच्या पोटावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.३) दुपारी फाजलपुरा भागात घडली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जग्या होंड्या दाभाडे (२०, रा. किशोर नाडे यांच्या घरात भाड्याने, फाजलपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी अजय अशोक नाडे (३१, रा. हसमत दवाखान्यासमोर, फाजलपुरा) हा मजुरी काम करतो आणि आरोपी जग्या दाभाडे हा त्याचा मित्र असून ते एकाच गल्लीत राहतात. ३ ऑक्टोबर रोजी अजयच्या मुलाचा वाढदिवस होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास अजय कामावरून घरी जात असताना, आरोपी जग्या दाभाडे याने त्याला हसमत दवाखान्याजवळ अडवले. आज तुझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याची पार्टी दे अशी मागणी केली. मात्र, अजयने पार्टी देण्यास नकार दिला. जग्याने त्याला शिवीगाळ करत मी तुला बघून घेईन अशी धमकी दिली आणि तो तिथून निघून गेला.

दुपारी ४ वाजेच्या सुमारास अजय त्याच्या घरी असताना आरोपी जग्या दाभाडे हातात चाकू घेऊन आला. घरात घुसून त्याने थेट अजयच्या पोटावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. तो दुसरा वार करणार, तेवढ्यात अजयचे मामा अनिल मिसाळ यांनी मध्ये पडून जग्याला ढकलून दिले. त्यामुळे आरोपी जग्या तिथून पळून गेला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बुधा शिंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT