Fraud Case : जुन्या कार विक्रीच्या बहाण्याने साडेपाच लाखांची फसवणूक (File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Fraud Case : जुन्या कार विक्रीच्या बहाण्याने साडेपाच लाखांची फसवणूक

याप्रकरणी वाहनांचे पैसे बुडवून फिर्यादीला मारहाण व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Fraud Case: ₹5.5 lakh fraud under the pretext of selling a used car

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या वाहनांची विक्री करून देण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची ५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाहनांचे पैसे बुडवून फिर्यादीला मारहाण व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष धोंडीराम पांचाळ (३२, रा. म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलसमोर) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी सतीश बबनराव मानेकर (३८, रा. न्यू गणेशनगर, सिडको) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी संतोष पांचाळ हा केंब्रिज चौक येथे 'अद्वैत कार्स' या नावाने जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करतो. मानेकर यांनी विक्रीसाठी त्यांच्या पाच गाड्या आरोपी संतोषकडे विश्वासाने दिल्या होत्या. त्यापैकी वॅगनआर आणि धुंदाई इऑन या दोन गाड्या आरोपीने विकल्या, मात्र त्याचे ५ लाख ६०

हजार रुपये मानेकर यांना दिले नाहीत. तसेच उर्वरित तीन गाड्या (टाटा टियागो, मारुती बलेनो, ग्रँड आय १०) चोरीला गेल्याची खोटी बतावणी त्याने केली. या फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी आणि पैसे मागण्यासाठी ३० मे रोजी मानेकर हे आरोपीकडे गेले होते. मात्र आरोपी संतोषने पैसे देण्यास साफ नकार देत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर अखेर एमआयडीसी सिडको पोलिसांत सोमवारी (दि.२९) फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT