Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

ठाकरे शिवसेनेचे आता चार शहरप्रमुखही नाराज

नेत्यांसाठी दिवसभर नॉट रिचेबल, महापालिकेसाठी चेहरे मिळेनात

पुढारी वृत्तसेवा

Four city chiefs of the Thackeray faction of Shiv Sena are now also unhappy.

सुनील कच्छवे

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शहरात पुन्हा एकदा गळती लागली आहे. पक्षातील बहुसंख्य प्रमुख चेहरे हे भाजप आणि शिंदेंच्या सेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे उद्धवसेनेला सक्षम उमेदवार मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यात। आता पक्षाचे चारही शहरप्रमुख स्थानिक नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी (दि. २३) चारही शहरप्रमुखांना फोनवर संपर्क करून पुढील नियोजनासाठी बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाही शहरप्रमुखांनी प्रतिसाद दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच शहरात पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरे से नेचे अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल झाले होते. त्यानंतर आता महापालिकेआधीही ठाकरे सेनेतून आऊटगोइंग सुरू झाले आहे. मागील आठवडाभरात माजी पापती संभाजीनगर महानगरपालिका नगरसेवक गिरीजाराम हळनोर, मनोज गांगवे, छाया राऊत, आशा भालेराव हे भाजप, शिंद `सेनेत दाखल झाले. तसेच मंगळवारी पक्षाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनीही भाजपात प्रवेश केला. ठाकरे सेनेकडे मनपासाठी ३४५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असले तरी यात कोणतेही प्रमुख चेहरे मात्र नाहीत. त्यामुळे पक्षाची कोंडी झाली आहे, असे असतानाच आता पक्षाचे चारही शहरप्रमुख नाराज असल्याची चर्चा आहे.

शहरप्रमुखांनी टाळले नेत्यांचे फोन

पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी पुढील नियोजनासाठी पक्षाच्या शहरप्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने आणि हरिभाऊ हिवाळे यांनी दोघांच्या फोनला प्रतिसाद दिला नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे सेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे सर्व स्थानिक नेत्यांवर नाराज असल्याचीही चर्चा आहे.

आदित्य ठाकरेंच्या हस्ते फुटणार नारळ

ठाकरे सेनेच्या प्रचाराचा नारळ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २६ डिसेंबर रोजी फुटणार आहे. आदित्य यांच्या उपस्थितीत क्रांती चौकातून रॅलीचेही नियोजन करण्यात येत आहे. तर त्यानंतर १० जानेवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.

मामू प्रकरणामुळे मुस्लिम मतदारांत नाराजी

माजी महापौर अब्दुल रशीद ऊर्फ रशीद मामू यांना नुकताच ठाकरे सेनेत प्रवेश देण्यात आला. मात्र चंद्रकांत खैरे यांनी त्यांना तीव्र विरोध दर्शविला आहे. सोमवारी शिवसेना भवन येथे आलेल्या रशीद मामू यांना झिडकारले. त्यामुळे अलीकडच्या काळात ठाकरे सेनेकडे आकर्षित होत असलेल्या मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT