Gangapur Crime News : गंगापुरात पाच क्विटल गोमांस जप्त; दोघांवर गुन्हा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur Crime News : गंगापुरात पाच क्विटल गोमांस जप्त; दोघांवर गुन्हा

शहरातील कुरेशी गल्ली परिसरात बेकायदेशीर-पणे गोवंश कत्तल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Five Quintals of Beef Seized in Gangapur; Case Registered Against Two

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कुरेशी गल्ली परिसरात बेकायदेशीर-पणे गोवंश कत्तल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंगापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी छापा टाकून पाच क्विटल गोमांसासह कत्तलीचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाणे गंगापूर येथे कार्यरत राजेंद्र भीमराव बडे (वय ३६) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. ते १ मे रोजी सकाळी ९ ते २ मे सकाळी ९ या वेळेत डायल ११२ ड्युटीवर होते. दरम्यान, २ मे रोजी सकाळी ८.२२ वाजता डायल ११२ वर कुरेशी मोहल्ला, पोस्ट ऑफिससमोरील लाकडाच्या बखारीत गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ८.४५ वाजता छापा टाकला. लोखंडी गेट उघडून आत प्रवेश केला असता तेथे हसन इमाम कुरेशी (वय ६०, रा. कुरेशी मोहल्ला, गंगापूर) आढळून आला. परिसरात कत्तल केलेल्या जनावरांचे मांस, रक्त व हाडांचे तुकडे आढळून आले.

पोलिसांनी पाहणीत कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. यासोबतच अंदाजे पाच क्विटल गोमांस (किंमत सुमारे १ लाख रुपये) जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख १२ हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नष्ट करण्यात दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोमांसाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून उर्वरित मांस नगरपालिकेच्या कचरा गाडीमार्फत अंबेवाडी शिवारातील कचरा डेपोमध्ये पंचासमक्ष खड्ड्यात टाकून आले. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी असताना बेकायदेशीर कत्तल करून विक्रीसाठी मांस साठवून ठेवल्याप्रकरणी हसन इमाम कुरेशी व अन्य एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार कलम ५, ५ (क), ९ व ९ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT