Fire brigade will get 70-meter high ladder
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नगररचना विभागाकडून शहरात २३ मजल्यापर्यंतच्या बांधकामांना परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या इमारतींत शेवटच्या मजल्यापर्यंत बचाव कार्य करता यावे, यासाठी प्रशासनाने ७० मीटर उंचीच्या लॅडर खरेदीची निविदा मंजूर केली असून कंत्राटदार कंपनीला कायदिश देखील दिले आहे. त्यामुळे लवकरच अग्निशमन विभागाच्या ताफ्यात ७० मीटर लॅडरसह १५ अद्ययावत वाहने दाखल होणार आहेत.
शहरातील अग्रिशमन विभाग अद्ययावत साधनसामग्रीसह सज्ज करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यासाठी प्रशासनाने नवी वाहने आणि आवश्यक असलेली यंत्रणा खरेदीला सुरूवात केली आहे. अग्निशमन विभागाचे बरीच वाहने जूनी झाली आहेत. त्यामुळे नवीन वाहने खरेदी करण्यात येत आहेत. या नवीन वाहनामध्ये ८५०० लिटरचे २ मोठे फायर टेंडर आहेत. ५५०० लिटरचे सहा फायर टेंडर आहेत, २ हजार लिटरचे २ फायर टेंडर असणार आहेत . दरम्यान, फोम टेंडर २, रेस्क्यू व्हॅन १, क्विक रिस्पॉन्स व्हॅन २ देखील खरेदी करण्यात येत आहे. सध्या मंत्री आणि व्हीआयपींच्या कन्व्हायमध्ये धा- वणाऱ्या फायर ब्रिगेडच्या वाहनांचा वेग मंत्र्यांच्या वाहनांपेक्षा अतिशय कमी आहे. त्यामुळे कन्व्हाय पुढे जातो, अन सुरक्षेची वाहने मागेच राहून जातात.
यासाठी मंत्री आणि व्हीआयपीच्या ताफ्यासाठी ही वाहने खरेदी करण्यात येत आहे. २३ मजल्याच्या इमारतीसाठी ७० मीटर लेंडर हे बँटो फिनलँड या कंपनीकडून खरेदी करण्यात येणार आहे त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. १५ कोटीचे हे लॅडर असणार असून १० वर्षाच्या ऑपरेशन मेंटेनंससाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. सध्या फक्त ४ मजली इमारतीवर लागलेली आगच मनपा नियंत्रणात आणू शकते. ही वाहने दाखल झाल्यानंतर मनपा फायर ब्रिगेड मुंबई, पुणेच्या धर्तीवर अद्ययावत असणार आहे.