Smuggling Case : तस्करीच्या गुन्ह्यात अटकेची भीती, अल्पवयीन मित्राकडून दागिने लुबाडले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Smuggling Case : तस्करीच्या गुन्ह्यात अटकेची भीती, अल्पवयीन मित्राकडून दागिने लुबाडले

पोलिस असल्याचा बनाव रचला, दोन आरोपींना अटक, तीन फरार

पुढारी वृत्तसेवा

Fearing arrest for smuggling, he robbed jewelry from his underage friend.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : एक कोटी रुपयांच्या सोने तस्करीच्या तुमच्यावर गुन्हा दाखल - झाला असून, अटक टाळण्यासाठी माझ्या मित्राचे मामा पोलिसांत आहेत. आपण प्रकरण आपापसांत मिटवू, असा बनाव रचून मित्रानेच अल्पवयीन मित्रालाच लुबाडले. सेटलमेंटसाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतील, अशी थाप मारून घरातून साडेतीन तोळ्यांचे - दागिने चोरायला भाग पाडले. हा प्रकार ३ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या एका - काळात शिवशंकर कॉलनी भागात घडला.

वेदांत राजकुमार राठोड (२२, रा. तीसगाव, ता. खुलताबाद, ह. मु. - बंजारा कॉलनी) व गौरव ज्ञानेश्वर धनवडे (२१, रा. ता. मंठा, जि. जालना, ह. मु. बजाजनगर) यांना अटक करण्यात आली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी माहिती दिली.

आरोपी गौरव हा बजाजनगर भागात राहून पोलिस भरतीची तयारी तसेच एका कंपनीतही कामाला जातो. तर आरोपी वेदांत हा पुणे येथे कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी ४६ वर्षीय व्यावसायिक यांच्या घरातील दागिने कपाटातून गायब असल्याचे आणि काही दागिने तिथेच असल्याचे समोर आल्यापासून त्यांना घरातीलच व्यक्तीवर संशय आला.

त्याच काळात मुलगा शांत राहत असल्याने त्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने सांगितले की, ३ नोव्हेंबर रोजी आर ोपी वेदांत त्याला मित्राला भेटायचे आहे, असे सांगून मिलिंद कॉलेज परिसरात घेऊन गेला होता. तिथे दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी पोलिस असल्याचे सांगून दोघांचेही फोन तपासले.

तुम्ही एक कोटींची सोन्याची स्मगलिंग केली आहे. त्यावरून सायबर गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्याकडे सोने असेल तर आम्हाला देऊन टाका नाही तर उद्या सकाळी तुम्हाला अटक होईल, अशी धमकी देऊन निघून गेले होते.

बनावट मामा उभा केला, पोलिसांत सांगितली ओळख

वेदांतने आपला मित्र तेजस्वी पवारच्या मामाची पोलिसांत ओळख आहे. तोच आपल्याला वाचवेल. आपण त्याला भेटू, अशी थाप मारली. आरोपी गौरव धनवडे याला मामा म्हणून भेटायला आला. त्याने पीएसआयला फोन केला. त्यानंतर सेटलमेंटसाठी २० लाख मागितले होते. मी ११ लाखांत फायनल केले. माझ्याकडचे २ लाख त्यांना अॅडव्हान्स देऊन आलो. आता वेदांत, फिर्यादीचा मुलगा व आणखी एक मित्र तिघे मिळून प्रत्येकी ३ लाख जमा करून ९ लाख एकत्र करून साहेबांना द्या, असे धनवडेने सांगितले.

घरातून चोरायला लावले दागिने

मुलाने माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगताच सोने असेल ना घेऊन ये, नाही तर अटक होईल, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलाने ४ नोव्हेंबरला घरातील २१ ग्रॅमचे सोन्याचे गंठण वेदांतकडे दिले. पुन्हा दोन दिवसांनी धनवडेने मी २ लाख व्याजाने घेतले असल्याने परत द्यावे लागेल, असे सांगून अजून सोने घेऊन ये, असे बजावले. पुन्हा मुलाने १६ ग्रॅमचे सोन्याच्या गहू मन्याची पोत आणून दिली.

दुसऱ्या मित्रांनी दमदाटी करताच प्रकार उघड

आरोपी वारंवार सोन्यासाठी धमकावत असल्याने मुलाला फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने त्याने इतर काही मित्रांना सांगितले. त्या मित्रांनी थेट वेदांतला दमदाटी करून विचारल्यावर त्याने संपूर्ण प्रकरणच बनवाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी सोने परत करण्याची मागणी केली. त्यावर आरोपीने टाळाटाळ केली. तर पोलिसांना सांगितले तर मी फाशी घेईल, अशी धमकी दिल्याने मुलगा गप्प होता. मात्र वडिलांनी विश्वासात घेतल्यावर त्याने प्रकार सांगितला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT