FDA Raid : कन्नडमधील एस.एम. एजन्सीवर एफडीएची धाड file photo
छत्रपती संभाजीनगर

FDA Raid : कन्नडमधील एस.एम. एजन्सीवर एफडीएची धाड

सुमारे तीन लाखाचे मिरची पावडर, हळद जप्त

पुढारी वृत्तसेवा

FDA raids SM agency in Kannad

छत्रपती संभाजीनगर / कन्नड, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील मेसर्स एस.एम. एजन्सीवर एफडीए पथकाने गुरुवारी अचानक धाड टाकली. या धाडीत एजन्सीमधील मिरची पावडर भाणि हळद पावडरचा एकूण ६२६ किलो आणि तब्बल २ लाख ९६ हजारांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

खाद्यपदार्थ व अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्याभरात कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. याअंतर्गत एफडीए पथकाने गुरुवारी कन्नड तालुक्यातील एस. एम. एजन्सी या किरकोळ अन्न विक्री प्रतिष्ठानाची तपासणी करण्यात आली. यात अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवलेला 'लाल हिना बँड'चा संशयास्पद व भेसळयुक्त अन्न साठा जप्त करण्यात आला आहे.

जप्त साठा सीलबंद करून पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न सुरक्षेशी खेळ करणाऱ्या इतर व्यावसायिकांवरही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

एजन्सीत आढळलेल्या इतर त्रुटी

संशयास्पद मिरची व हळद पावडरच्या साठ्यासह प्रतिष्ठानामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. यात स्वच्छता राखण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. कामगारांची वार्षिक वैद्यकीय आरोग्य तपासणी केलेली नव्हती. ग्राहक तक्रार निवारणाची कोणतीही व्यवस्था तिथे आढळून आली नाही.

SCROLL FOR NEXT