ऐन दिवाळीत एफडीएचा भेसळखोरांना दणका; सात आस्थापनांचे परवाने निलंबित file photo
छत्रपती संभाजीनगर

FDA : ऐन दिवाळीत एफडीएचा भेसळखोरांना दणका; सात आस्थापनांचे परवाने निलंबित

सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत शहरासह पैठण, गंगापूर, शेंद्रा आणि सातारा परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

FDA cracks down on adulterators just in time for Diwali; Licenses of seven establishments suspended

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत शहरासह पैठण, गंगापूर, शेंद्रा आणि सातारा परिसरात ही कारवाई करण्यात आली. यात दोन तेल पुनपैंकिंग युनिट, दोन हॉटेल, पतंजलीचा सुपर वितरक आणि तीन मिठाई उत्पादक आस्थापनांचा समावेश आहे. सातारा परिसरातील सात्विक फूड (शाहीभोज) हॉटेलला तपासणीत फ्रिज गंजलेला व अस्वच्छ होता. कच्चे-शिजविलेले पदार्थ एकत्र ठेवले होते. पुंडलिकनगर येथील सेवा बिर्याणी हाऊसकडे हॉटेल व्यवसायाचा परवाना नसताना किरकोळ विक्रेत्याच्या नोंदणीवर व्यवसाय सुरू होता. येथे २१ गंभीर त्रुटी आढळल्या.

पुंडलिकनगर रोडवरील श्रीराम स्वीट मार्टकडे किरकोळ विक्रीचा परवाना असताना मिठाईचे उत्पादन सुरू होते. बजाजनगरमधील जनसेवा बेकर्स अँड स्वीट्समध्ये गंजलेली उपकरणे, अस्वच्छ फरशी आणि तापमान नियंत्रणाचा अभाव आढळला. शेंद्रा येथील श्री साई स्वीट्स अँड नमकीनमध्ये ३९ निकषांचे उल्लंघन झाले. पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रेही नव्हती. लासूर स्टेशन येथील श्री गुरु गणेश एंटरप्रायझेसमध्ये १८ निकषांचे पालन होत नव्हते.

सुंदरवाडी येथील पतंजलीच्या दिव्य महावितरकच्या गोदामात खाद्यपदार्थ रॅकऐवजी थेट जमिनीवर ठेवले होते. अस्वच्छता आणि पॅकिंगमधून गळतीही आढळली. आडूळ येथील एम. के. ट्रेडिंग कंपनीत ३ लाख ६१ हजार ३६० रुपये किमतीचे १ हजार ९४४ किलो रिफाइंड सोयाबीन तेल आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. अजिंठकर यांनी हा साठा जप्त करून सील केला. सात्विक फूड (शाहीभोज), सेवा बिर्याणी हाऊस, दिव्य महावितरक, श्री गुरु गणेश एंटरप्रायझेस, श्रीराम स्वीट मार्ट, जनसेवा बेकर्स अँड स्वीट्स आणि श्री साई स्वीट्स अँड नमकीन या सात आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT