ज्ञानेश्वर करपे (Pudhari Photo)
छत्रपती संभाजीनगर

Farmer Drowned | पाटेगाव येथे गोदावरीच्या पुरात चारा आणण्यासाठी गेलेला शेतकरी वाहून गेला

Paithan Flood | काही अंतरावर नदीकाठच्या झुडपांत आढळला मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

Godavari river farmer drowned

पैठण : नाथसागर धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पाटेगाव येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.३०) उघडकीस आली.

मृत शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर एकनाथ करपे (वय ४८, रा. पाटेगाव, ता. पैठण) असे आहे. ते जनावरांसाठी नदीकाठावर चारा आणण्यासाठी गेले असता, अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काही अंतरावर नदीकाठच्या झुडपांत त्यांचा मृतदेह सापडला.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने पंचनामा केला. तलाठी दिलीप बाविस्कर आणि योगेश रावस यांच्या उपस्थितीत तपासाची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रावसाहेब आव्हाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT