Fraud Case : महसूल मंत्री बावनकुळेंच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Fraud Case : महसूल मंत्री बावनकुळेंच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक

शेत रस्ता अडविल्याने न्यायासाठी फेसबुकवर केला होता मेसेज

पुढारी वृत्तसेवा

Farmer cheated in the name of Revenue Minister Bawankule

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : तुमचे शेत रस्त्याचे प्रकरण तहसीलदारांना सांगून सोडवायला लावतो, अशी थाप मारून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने सायबर भामट्याने शेतकऱ्याची ३ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार १४ ते १६ ऑगस्टदरम्यान गारखेडा परिसरात घडला. याप्रकरणी रविवारी (दि.१७) पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी जगन्नाथ जयाजी शेळके (४६, रा. न्यू हनुमाननगर, गल्ली क्र. ३, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पळशी येथे शेती आहे. त्यांच्या शेत जमिनीच्या रस्त्याचे प्रकरण तहसील कार्यालयात सुरू आहे. ते फेसबुकवर चंद्रशेखर बावनकुळे यांना फॉलो करत होते. त्यावर शेळके यांनी एक मेसेज केला होता. त्यामध्ये साहेब नमस्कार मी शेतकरी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र, माझे उपजीविकेचे साधन शेती असून, ती आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवून माझी वडिलोपार्जित शेती पडीक पाडली आहे.

जून महिन्यात लागवड करता आली नाही. मला न्याय मिळेल का, असे लिहून स्वतःचा मोबाईल क्रमांक सोबत दिला होता. गुरुवारी (दि.१४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना एका नंबर वरून कॉल आला. तुमचे शेत रस्त्याचे प्रकरण मिटले आहे का? अशी विचारणा केली. त्यावर शेळके यांनी नाही, असे उत्तर देताच भामट्याने आमच्या सिस्टीमवर तुमचे सक् सेसफुल दाखवीत असल्याचे सांगितले.

▶▶ म्हणे मुंबईहून बावनकुळेंचा पीए बोलतोय

शेळके यांनी विचारणा केली तेव्हा भामट्याने मुंबईहून बावनकुळेंचा पीए निकम बोलतोय, अशी ओळख सांगितली. तुमचे प्रकरण तहसीलदार साहेबाना सांगून सोडवायला लावतो. मंडळ अधिकाऱ्यांचा नंबर शेळके 1 यांच्याकडून घेतला. त्यानंतर तहसीलदारांशी बोलणे करून देतो म्हणत कॉन्फरन्स कॉलवर शेळके यांचे एकाशी बोलणे करून दिले. त्यानंतर पुन्हा भामट्याने शेळके यांना फोन करून पोलिसांचे संरक्षण देण्यासाठी चार हजार रुपये पावती फाडावी लागेल. व्हॉट्सअॅपवर स्कॅनरचा फोटो पाठविला. त्यावर शेळके यांनी गुरुवारी तीन हजार पाठविले.

▶▶▶ पुन्हा चार हजारांची मागणी

दोन दिवसांनी शनिवारी (दि. १६) पुन्हा भामट्याने शेळके यांना फोन केला. रस्ता मंजुरीनंतर तुम्हाला रस्त्यावर मुरूम टाकावा लागेल. त्यासाठी 2 तुम्ही मला चार हजार रुपये स्कॅनरवर पाठवा. मात्र शेळके यांना फॉड कॉल असल्याची खात्री झाल्याने त्यांनी फोन कट केला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक भंडारे करत आहेत.

▶▶ भामट्याचे लोकेशन मुंबई

शेळके यांनी बावनकुळेंच्या नंबरवर संपर्क साधला तेव्हा त्यांचे स्वीय सहायक विशाल भुते यांनी फोन घेतला. त्यांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर भुते यांनी निकम नावाचा कोणीही व्यक्ती नसल्याचे सांगून तो फ्रॉड असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. शेळके यांनी भामट्याला लाईव्ह लोकेशन पाठवण्यास सांगितले. तेव्हा त्याने मुंबईच्या आमदार निवास जवळचे लोकेशन पाठवले.

▶▶▶ नवी मुंबई क्राईम ब्रँचसह पोलिसांकडून शोध

प्रकरण गंभीर असल्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे यांना सखोल तपासाच्या सूचना केल्या. तसेच मंत्री बावनकुळे यांनी देखील पोलिसांना आदेश दिल्याने नवी मुंबई गुन्हे शाखेचे पथक आणि पुंडलिकनगरचे पथक आरोपीचा मुंबईत शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT