फर्दापूर बसस्थानकावर एसटी वाहकांची दादागिरी File Photo
छत्रपती संभाजीनगर

फर्दापूर बसस्थानकावर एसटी वाहकांची दादागिरी

विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यास नकार, महिला वाहकाची अरेरावी

पुढारी वृत्तसेवा

Fardapur st bus driver conductor passenger student girls Abusive treatment

सागर भुजबळ

फर्दापूर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचालक आणि वाहकांनी प्रवाशांप्रती दाखविलेला हलगर्जीपणा आणि उद्धटपणामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रवासादरम्यान अपमानास्पद वागणूक दिली जात असून शनिवारी (दि. १९) फर्दापूर बसस्थानकावर अशीच एक धक्कादायक घटना घडली.

शनिवारी सकाळी वाकोद (ता. जामनेर) येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी फर्दापूर बसस्थानकावर छत्रपती संभाजीनगर ब-हाणपूर (एमएच १४ एलएक्स ८६१०) या एसटी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता, या बसमधील महिला वाहकाने त्यांना थेट बसमध्ये चढू नका, तुम्हाला माझीच बस दिसते का असा दम भरला.

यावेळी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल असे सांगून विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू देण्याची विनंती केली, मात्र सदरील महिला वाहकाने पालकांनाही अरेरावीच्या भाषेत बोलून त्यांचाही अंत्यत वाईट पद्धतीने अपमान केल्याचा प्रकार यावेळी घडला.

महिला वाहकाचा हा उद्धटपणा पाहून यावेळी बसस्थानकावर उपस्थिती असलेले पत्रकार अनिल रावळकर यांनी या घटनेचे त्यांच्या मोबाईलमध्ये छायाचित्रण करायला सुरुवात केली. मात्र यामुळे सदरील महिला वाहक अधिकच चिडल्या व त्यांनी पत्रकार अनिल रावळकर यांना ही अंत्यत खालच्या भाषेत बोलून त्यांच्यावर अपमानजनक शब्दाचा भंडीमारच केला. शेवटी उपस्थित नागरिकांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण क्षमले व विद्यार्थी त्याच बसमधून शाळेत निघून गेले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरून धा-वणाऱ्या एसटी महामंडळाच्या अनेक चालक वाहकांनी अजिंठा घाटावरील एका ढाब्यावर अनधिकृतपणे जास्त वेळ थांबण्याची सवय लावून घेतली आहे. ढाब्यावर वाया घालविलेला वेळ भरून काढण्यासाठी नंतर ते सुसाट वेगाने गाड्या पळवितात व फर्दापूर बसस्थानकावर न थांबताच भरधाव वेगाने पुढे निघून जातात परिणामी, फर्दापूर बसस्थानकावर थांबलेल्या शालेय विद्यार्थी, पर्यटक व अन्य प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहावी लागत आहे. त्यातच एखादी बसस्थानकावर थांबलीच तर त्यातील वाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास मज्जाव करून विद्यार्थ्यांना प्रवास नाकारत आहे. यामुळे एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT