Sambhajinagar News : खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी अंतामागे कौटुंबिक कलह ? file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी अंतामागे कौटुंबिक कलह ?

मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत संगीता यांचा माहेरच्यांवर आरोप, तर 'संगीतानेच भावाला घराबाहेर काढले', सासरच्यांचेही उत्तर

पुढारी वृत्तसेवा

Family feud behind the unfortunate end of the Chandgude family on Khawdya mountain?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा खवड्या डोंगरावर घडलेल्या चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या सामूहिक मृत्यूच्या घटनेला आता दररोज नवनवे वळण मिळत आहे. या घटनेमागे मुलाचा आयफोनचा हट्ट हे कारण नसून, २० वर्षांपासून धुमसत असलेला कौटुंबिक कलह, प्रेमविवाहाला असलेला विरोध आणि सासर-माहेरच्या वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे.

मृत्यूच्या अवघ्या ६ दिवसांपूर्वी मयत संगीता चांदगुडे यांनी त्यांच्या यूट्यूबवर टाकलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी पती आणि नणंदांवर आरोप केले आहेत. मात्र, दुसरीकडे पती मुरलीधर यांच्या बहिणीने (नणंद) आणि कुटुंबाने संगीता यांच्या व्हिडिओतील आरोप खोडून काढले आहे. तर, संगीता यांच्या बहिणीनेही पलटवार करत बहिणीच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मृत्यूपूर्वी संगीता चांदगुडे यांनी १६ ऑगस्ट रोजी युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्या म्हणतात की, आजकालच्या बहिणींना भावजयीला कधीच समजून घ्यायचे नसते. भावाचा संसार कसा मोडता येईल, याचाच त्या प्रयत्न करतात. माझा पहिला मुलगा हे जग सोडून गेला, त्या वेळेस यांनी आम्हाला शिवीगाळ केली. प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. माझा मुलगा गेल्यावर तुम्ही सण साजरे करून खात होतात, पार्त्या करत होतात.

पती मुरलीधर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या म्हणतात, पंधरा वर्षात बायकोला जो त्रास झाला, त्यासाठी तुम्हाला वाईट वाटले नाही. जो मुलगा गेला त्याच्यासाठी वाईट वाटले नाही आणि जो मुलगा आहे (कुणाल), त्याच्यासाठीही वाईट वाटले नाही. पण आज तुमच्या बहिणीबद्दल इतकं वाईट का वाटतंय? बहिणींनी इतक्या चुका केल्या, तरी त्या तुम्हाला चांगल्या वाटतात आणि मी केवळ सत्य सांगतेय, तरी मला तुम्ही वाईट ठरवून शिक्षा कशी देऊ शकता?,

नणंदांवर आता दुःखाचा प्रसंग आल्याने त्यांनी भावजयीने (संगीता) सर्व विसरून त्यांना साथ द्यावी, अशी अपेक्षा पती व नातेवाईक करत होते. याला संगीता यांनी स्पष्ट नकार दिला होता. तुम्ही मला आतापर्यंत कधीच साथ दिली नाही, तर तुम्ही माझ्याकडूनही अपेक्षा करू नका, मी तुमच्या या गोष्टींचा भाग बनणार नाही, असा ठाम निर्णय त्यांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितला होता.

मुरलीधर यांची बहीण म्हणते 'संगीतानेच भावाला घराबाहेर काढले'

संगीता यांच्या या व्हिडिओनंतर, मुरलीधर चांदगुडे यांचे मूळ गाव धनगर पिंपळगाव (जि. जालना) येथील त्यांच्या कुटुंबानेही माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. मुरलीधर यांची बहीण शोभा म्हस्के म्हणाल्या की, घरात सतत वाद होत असल्याने संगीता आणि मुलगा कुणाल यांनीच काही दिवसांपूर्वी मुरलीधर यांना घराबाहेर काढले होते. भाऊ आमच्याशी बोलला की ती त्याच्याशी भांडण करायची. तो गावाकडे यायचा पण कधी घरी आला नाही. दारावरून शेतात जायचा. मुरलीधर आणि संगीता यांचा २० वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मुरलीधरला वडील म्हणाले होते, ती शहरातील मुलगी आहे, आपण गावाकडचे माणसं. हे लग्न करू नको, पण त्याने ऐकले नाही. तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात बोलचाल बंद होते. तू आमच्यासाठी काही करू नको, आम्ही आई-बापाचे बघून घेऊ, तू फक्त त्यांच्याशी बोलत जा अशी विनंती बहिणींनी केली होती. मात्र, त्याचा आमच्याशी संवादही तुटला होता, अशी प्रतिक्रिया मुरलीधर यांच्या बहिणीने दिली आहे

दाजींच्या डोक्यात फावडं कुणी घातलं होतं?' संगीताच्या बहिणीचा पलटवार

मृत संगीता चांदगुडे यांच्या बहिणी पल्लवी पाटील यांनी मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबीयांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. आमची बहीण गेली आहे, तिचा मुलगाही गेला आहे. मात्र आमच्या दार्जीच्या आई-वडिलांनी आमच्या बहिणीवर आरोप करायला सुरुवात केली आहे. माझ्या बहिणीने नवऱ्याला मुठीत ठेवले आणि गेल्या २० वर्षांपासून त्यांना कुटुंबापासून तोडले, असे आरोप केले जात आहेत, मला त्यांना विचारायचंय, तुम्ही तुमच्या मुलाला (मुरलीधर) त्या गाव सोडण्यासाठी शेत सोडण्यासाठी त्या मुलाच्या डोक्यात फावर्ड कुणी घातलं होतं? का घातलं होतं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार आहात का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे. पल्लवी पाटील यांनी आपल्या कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे सांगत सध्या आरोप-प्रत्यारोप नकोत, आम्हाला बहिणीच्या दुखाःतून सावरू द्या. आमच्यावर आघात झाला आहे. आम्ही थोडे सावरलो की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ. योग्य वेळी योग्य उत्तरे देऊ, सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ. पण आत्ता आम्ही शांत आहोत, आम्हाला शांतच राहू द्या, असा इशाराही त्यांनी बहिणीच्या सासरच्या मंडळींना दिला.

अंत्यसंस्कार वेगळे पण अस्थिविसर्जन एकत्रच

दाजींच्या डोक्यात फावडं कुणी घातलं होतं?' संगीताच्या बहिणीचा पलटवार मृत संगीता चांदगुडे यांच्या बहिणी पल्लवी पाटील यांनी मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबीयांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. आमची बहीण गेली आहे, तिचा मुलगाही गेला आहे. मात्र आमच्या दार्जीच्या आई-वडिलांनी आमच्या बहिणीवर आरोप करायला सुरुवात केली आहे. माझ्या बहिणीने नवऱ्याला मुठीत ठेवले आणि गेल्या २० वर्षांपासून त्यांना कुटुंबापासून तोडले, असे आरोप केले जात आहेत, मला त्यांना विचारायचंय, तुम्ही तुमच्या मुलाला (मुरलीधर) त्या गाव सोडण्यासाठी शेत सोडण्यासाठी त्या मुलाच्या डोक्यात फावर्ड कुणी घातलं होतं? का घातलं होतं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार आहात का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे. पल्लवी पाटील यांनी आपल्या कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे सांगत सध्या आरोप-प्रत्यारोप नकोत, आम्हाला बहिणीच्या दुखाःतून सावरू द्या. आमच्यावर आघात झाला आहे. आम्ही थोडे सावरलो की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ. योग्य वेळी योग्य उत्तरे देऊ, सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ. पण आत्ता आम्ही शांत आहोत, आम्हाला शांतच राहू द्या, असा इशाराही त्यांनी बहिणीच्या सासरच्या मंडळींना दिला.

खवड्या डोंगरावरील घटनेनंतर घाटी रुग्णालयातही दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांमध्ये वाद झाला. संगीता यांच्या नातेवाइकांनी मुरलीधर यांच्या घरच्यांना तिन्ही मृतदेह एकत्र देण्यास नकार दिला होता. मृतदेह ताब्यात मिळण्यात अडचण नको म्हणून मुरलीधर यांचे नातेवाईक शांत राहिले. यामुळे मुरलीधर यांच्यावर गावी तर पत्नी, मुलावर मुकुंदवाडीत अंत्यसंस्कार झाले. मात्र, रविवारी सकाळी संगीता आणि कुणाल यांच्या अस्थी घेऊन त्यांचे नातेवाईक पैठणला गेले. त्याचवेळी मुरलीधर यांचे आई-वडील आणि बहिणीही त्यांच्या अस्थी घेऊन पैठणला पोहोचले. तिथे गोदावरी पात्रात तिघांच्याही अस्थींचे एकत्रच विसर्जन करण्यात आले.

नेमके कारण शोधणे कठीण

चांदगुडे कुटुंबात नेमके काय सुरु होते. कुणालच्या मनात टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार का आला? कुटुंबातील तणाव काय होता? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता त्या कुटुंबातील तिघेही नसल्याने निष्कर्ष काढणे कठीण आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राणिमित्राने नेले 'शेरू'ला

चांदगुडे यांच्या घरातील शेरू नावाच्या कुत्र्याचे प्राणीमित्राने पालकत्व घेतले आहे. चांदगुडे यांनी त्याला फार जीव लावला होता. संगीता यांनी त्याला खाऊ घालतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकलेले आहेत. त्यांच्या जाण्याने शेरू एकटा पडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT