Fake notes of Rs 12,000 found in bank's CDM
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
बँकेच्या सीडीएम (कॅश डिपॉझिट मशिन) मध्ये १२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्याने आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार २९ जा-नेवारी रोजी गारखेडा परिसरात असलेल्या आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मशीनमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पुडंलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर रोडवरील आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले नीलेश महेश शिंधीकर (४०) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, २९ जानेवारी रोजी सकाळी कॅशियर समाधान ठोंबरे यांनी सीडीएम मशिनमधील कॅश तपासणीदरम्यान ५०० रुपयांच्या नऊ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आणून दिले.
बँकेच्या अंतर्गत नियमांनुसार एटीएम विभागाकडून संबंधित व्यवहाराची तपासणी करण्यात आली. तपासात सीडीएम मशिनमध्ये २७ जानेवारी रोजी रात्री ७.५८ वाजेच्या सुमारास कलीम खान याच्या खात्यात १२ हजार रुपये जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले.