कल्पना भागवतला दिलेले प्रमाणपत्र खरे असल्याचा कबुलीजबाब Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Fake IAS Kalpana Case: माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांची चौकशी

कल्पना भागवतला दिलेले प्रमाणपत्र खरे असल्याचा कबुलीजबाब; पोलिस आयुक्तांनी घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

Fake female IAS officer's Afghan-Pak connection Afghan-Pak connection

छत्रपती संभाजीनगर : तोतया आयएएस कल्पना भागवतच्या घरात सापडलेल्या प्रमाणपत्राबाबत सिडको पोलिसांनी मंगळवारी (दि.२) नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. एस. एन. पठाण यांची ठाण्यात सुमारे चार ते पाच तास चौकशी केली. त्यात कल्पनाला दिलेले प्रमाणपत्र खरे असल्याचे समोर आले आहे. मात्र तिने आयएएस अशी ओळख सांगितल्याने तिला ते दिल्याचे जबाबात म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रजेवरून परत येताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी प्रकरणाचा आढावा घेतला असून, गुन्हे शाखेसह सायबर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.

शहरातील हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये सहा महिने वास्तव्य करणाऱ्या तोतया आयएएस कल्पना भागवत, तिचा अफगाणी मित्र अशरफ आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडीच्या नावाने बनवेगिरी करणारा डिम्पी हरजाई या त्रिकुटाची सध्या आयबी, एटीएस आणि सिडको पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक अतुल येरमे, योगेश गायकवाड यांनी कल्पनाच्या संपर्कातील सुमारे २८ जणांना नोटीस बजावल्या आहेत. त्यात नागपूरच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांचाही समावेश आहे. त्यांनी कल्पना भागवतला लेटर हेडवर आयएएस असे संबोधून तिने सामाजिक व धार्मिक कार्य चांगल्या पध्दतीने केले असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. चौकशी झाली होती.

पोलिस आयुक्त रूजू

मंगळवारी सिडको पोलिस ठाण्यात पठाण हे चौकशीसाठी सायंकाळी हजर झाले. त्यांचा लेखी जबाब घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यांनी कल्पना भागवत प्रकरण उघड करून सिडको पोलिसांनी वेगाने तपास प्रमाणपत्र आपणच दिल्याचे पाकिस्तान, सांगितले आहे. एका कार्यक्रमात ओळख झाली, मात्र ओळख कोणाच्या माध्यमातून झाली याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. दोन दिवसांपूर्वी १९ कोटींच्या चेक प्रकरणात चेतन भानुशालीची करून अनेक खळबळजनक मुद्दे समोर आणले. अफगाणिस्तान कनेक्शनमुळे या गुन्ह्याला महत्त्व प्राप्त झाले. दरम्यान, मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी रजेवर गेलेले पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नुकताच पदभार घेऊन महिनाभरात शहरात घडलेल्या सर्व गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्याच्या तपासात प्रथमच गुन्हे शाखेची इंट्री झाली आहे. रात्री उशिरा पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, हसूलच्या निरीक्षक स्वाती केदार या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कल्पना भागवतसह अशरफ आणि डिम्पीची कसून चौकशी केली.

पुण्यातील भाकरेला नोटीस

कल्पनाच्या आर्थिक व्यवहारात पुण्यातील नीलेश भाकरेचे नाव आले आहे. हा भाकरे कोण, तो काय काम करतो, त्याचा कल्पनाशी संबंध कसा आला, तिच्या आर्थिक व्यवहारात त्याचे नाव कसे आले हे अद्याप समोर आलेले नाही. ही कडी उलगडण्यासाठी पोलिसांनी भाकरेला नोटीस दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. कल्पानाने काही जणांना पैसे दिले. त्यांनी कोणत्या कामासाठी पैसे पाठविले, याची चौकशी केली जाणार आहे. कल्पनाला पैशाबाबत प्रश्न विचारताच ती प्रत्येकाला तो माझा भाऊ आहे, असे उत्तर देते. तिच्या या भाऊ उत्तराने सिडको पोलिसही चक्रावून गेले आहेत.

राहता, शिर्डीतील शेटे, लोढा रडारवर

कल्पना भागवत हिच्याकडे आढळलेली २०१७ च्या आयएएस निकालाची यादी तिला मनोज लोढा आणि दत्तात्रय शेटे यांनी दिल्याचे ती सांगते. मात्र राहता आणि शिर्डी येथील लोढा आणि शेटे अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. त्या दोघांच्या चौकशीत अनेक खुलासे होऊ शकतात. दरम्यान, सिडको पोलिसांनी कल्पना भागवत पूर्वी भाड्याने राहत असलेल्या कांचनवाडी भागातील घरमालकाचीही चौकशी करून जबाब घेतला. तर अन्य एकालाही चौकशीसाठी बोलावले होते, असे सूत्रांनी सांगितले.

कल्पनाला पैसे पाठवणाऱ्यांची होणार चौकशी

१ जानेवारी ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कल्पनाच्या खात्यावर ३२ लाख ६८ हजार ८६२ रुपये आले. त्यात अशरफ खिल (अफगाणिस्तान) याने २ लाख ३१ हजार २०० रुपये, सुंदर हरी ऊर्फ सुरेश जैन आणि अभिजित क्षीरसागर यांनी प्रत्येकी दीड लाख, दत्तात्रय शेटे ७ लाख ८५ हजार, रमेश मुळे २ लाख २५ हजार ५०० रुपये, सुधाकर जाधव १ लाख १८ हजार रुपये, नागेश अष्टीकर १ लाख ४५ हजार रुपये आणि समाधान बहादुरे ९७हजार ५०० रुपये पाठवल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT