Engineering student caught with 10 kg of marijuana
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अभियांत्रिकीचा खर्च भागविणे कठीण झाल्याने एक विद्यार्थी थेट गांजा तस्करीच्या आरोपी किशोर मार्गावर गेल्याची सांगळे धक्कादायक घटना समोर आली आहे. झेंडा चौक येथे किशोर गणेश सांगळे (२१, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) याला मुकुंदवाडी पोलिसांनी सापळा रचून पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याच्या ताब्यातून १० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.
अधिक माहितीनुसार, आरोपी किशोर हा पुणेच्या सिंहगड भागातील एका अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याच्या गावाकडे घरी त्याची एकटी आई असते. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने त्याने त्यातून अभियांत्रिकीला प्रवेश मिळविला. मात्र आता खर्च पेलवत नसल्याने तो वाईट मार्गाला गेला. काही मित्रांनी त्याला गांजा तस्करीच्या मार्गावर नेले.
त्याच्याकडे इतर जिल्ह्यातून आलेला १० किलो गांजाची बॅग केवळ एका पेडलरला देण्याचे काम होते. त्यासाठी त्याला पाच हजार रुपये मिळणार होते. त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातून ही गांजाची बॅग घेतली. तेथून ती बॅग झेंडा चौकात घेऊन गेला. मात्र पेडलर येण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या. बॅग कोणी दिली व त्याला ५ हजार देण- ारा कोण ? हे समोर आलेले नाही. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे करत आहेत.