Sambhajinagar News : नगरपालिका हद्दीतही आता पाडापाडी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : नगरपालिका हद्दीतही आता पाडापाडी

रस्ते मोजणी करून सीमांकन आखून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Encroachment removal campaign likely to be launched within Nagarpalika limits of the district

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील पाडपाडीनंतर आता जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतही अतिक्रमण हटाव मोहीम रबवली जाणार असल्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांमध्ये अतिक्रमित बांधकामांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिका हद्दीत रस्त्यांची भूमिअभिलेख आणि नगररचना विभागामार्फत संयुक्त मोजणी करून सीमांकन करून घ्यावे, असे आदेश गुरुवारी (दि. १७) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

तसेच नाशिक त्यैबकेश्वर येथील कुंभमेळामुळे घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता वेरूळकडे जाणारे रस्ते मोकळे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपालिका प्रशासन शाखेची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०, नगरपालिकांमधली अनुकंपा पदभरती, विभागीय परीक्षा, घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्याकरण याबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, नाशिक- त्र्त्यबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. त्यानिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता वेरूळकडे जाणारे रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे.

तसेच घृष्णेश्वर मंदिर परिसरात रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांची मोजणी करून घ्यावी. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्येही संयुक्त मोजणी करून सीमांकन करून घ्यावे. पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश यावेळी त्यांनी दिले. तसेच नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी झिरो पेंडसी करावी.

नावीन्यपूर्ण जनहिताचे उपक्रम राबवावे, विकसित महाराष्ट्र २०४७ या सर्वेक्षणात आपल्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढवावा. प्रत्येक नगरपालिकेने नागरिकांसाठी तक्रार निवारण दिवस निश्चित करावा. ई-आऑफिसला चालना द्यावी, यासह प्रभाग रचना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही आदेश यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. या बैठकीला पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मुख्याधिकारी संभाजी देशमुख, बी.यू. विघोत, पी.पी. अंभोरे, समीर शेख, कारभारी दिवेकर, ज्ञानेश्वर ठोंबरे, संतोष आगळे, सहा. आयुक्त ऋषिकेश भालेराव आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT