Sambhajinagar News : पावसाळ्यात करंट लागतोच; त्यात काय एवढे, वीज कर्मचाऱ्यांचे अजब उत्तर  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पावसाळ्यात करंट लागतोच; त्यात काय एवढे, वीज कर्मचाऱ्यांचे अजब उत्तर

शॉक लागलेल्या तरुणांना वीज कर्मचाऱ्यांचे अजब उत्तर

पुढारी वृत्तसेवा

Electric Shock occurs during monsoon; What's so special about it, strange answer from electricity workers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

दोन दिवस सुरू असलेल्या सलग पावसामुळे एसबी कॉलनीतील मुख्य रस्त्यावर गुरुवारी (दि. २८) रात्री ९.३० च्या सुमारास करंट उतरला होता. तेथून जाणाऱ्या दोन ते तीन तरुणांना शॉक लागला. तरुणांनी ही बाब महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवली. कर्मचारी घटनास्थळावर आले खरे, परंतु ज्यांनी फोन केला होता, त्यांनाच पावसाळ्यात करंट लागतोच, त्यात काय एवढे, असे उद्धट उत्तर दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

साजन सरिता कापड दुकानांकडून एसबी कॉलनीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास तेथील विद्युत खांबावर सतत स्पार्किंग होऊन तेथील रस्त्यावर करंट उतरला होता. तेथून जाणाऱ्या दोन ते तीन तरुणांना शॉक लागला. शॉक लागल्याने घाबरलेल्या तरुणांनी ही बाब महावितरणच्या औरंगपुरा कार्यालयाला कळवली. माहिती कळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी करंट परिसराची पाहणी केली. याचदरम्यान ज्यांना शॉक लागला होता, ते तरुण ही माहिती सांगण्यासाठी कर्मचाऱ्यांजवळ गेले असता पावसाळ्यात करंट लागतोच उतरलेल्या ाजी व्यक्त केली. त्यात काय एवढे, असे उद्धटपणे उत्तर दिले. महावितरण कर्मचाऱ्यांच्या या उत्तरामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली.

रस्त्यावरून वाहतूक सुरूच

रस्त्यात करंट उतरलेला असतानाही तेथून ये-जा करण्यात या कर्मचाऱ्यांनी कोणालाही मज्जाव केला नाही, किंवा तशी माहितीही दिली नाही. या रस्त्यावरून धोकादायक वाहतूक सुरूच होती. महावितरण कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सुदैवाने येथे अपघात झाला नाही. याबाबत अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अर्ध्या तासाने दुरुस्तीला सुरुवात

माहिती मिळताच दोन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी गाडी आणि आणखी कर्मचारी बोलावून घेतले. गाडी आल्यानंतर सर्वच कर्मचारी गप्पात रंगले. रस्त्यात करंट उतरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असताना कर्मचारी मात्र तब्बल अर्धा तास गप्पांत मग्न होते. त्यानंतर त्यांनी परिसरातील विद्युत पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम केले. कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीपणावर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT