Election Campaign Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Election campaign : कडाक्याच्या थंडीतही निवडणूक प्रचाराचा जोर

कमाल तापमान १० अंशांवर : वाढत्या गारठ्यातही पदयात्रा, रॅली, कॉर्नर सभा

पुढारी वृत्तसेवा

Election campaign in full swing despite bitter cold

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात कडाक्याची थंडी जाणवत असून, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पहाटेपासूनच गारठा वाढलेला असतानाही उमेदवार, कार्यकर्ते आणि नेते प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. यावेळी गळ्यात मफलर तर काहींच्या डोक्यावर टोपी दिसून येत असून, हुडहुडी भरवणाऱ्या थंडीतही प्रचार फेऱ्या, पदयात्रा, कॉर्नर सभा आणि घरोघरी भेटी सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांत कमाल तापमान १० अंशांवर आले आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका वाढला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसून, उमेदवार प्रचारासाठी सकाळीच घराबाहेर पडत आहेत.

तसेच उमेदवारांनी दुपारनंतरही प्रचाराचा जोर वाढवला आहे. यात संध्याकाळच्या वेळी प्रचार सभांना गर्दी होत असल्याचे चित्र आहे. थंडीतही प्रचारस्थळे गजबजले दिसून येत आहे. तर वाढत्या थंडीत कार्यकर्त्यांसाठी गरम चहा हीच मोठी ऊब ठरत आहे. दरम्यान थंडीची पर्वा न करता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार कसोशीने प्रयत्न करत असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र फु आहे.

यात आरोप-प्रत्यारोप, विकासाचे दावे, मागील कारभारावर टीका आणि भविष्यातील स्वप्नांचे आश्वासन यावर प्रचाराची धार चढली आहे. प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत असल्याने उमेदवारांकडून एकही संधी सोडाली जात नसल्याचे दिसून येत आहे. थंडी वाढली असली, तरी प्रच- ारातील शब्दयुद्धाने राजकीय आखाडा तापले आहे. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीतही मतदारांमध्ये राजकीय चर्चाना उधाण आले आहे. चौकाचौकांत, चहाच्या टपऱ्यांवर निवडणुकीचे गणित रंगताना दिसत आहे. कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या प्रचाराने शेवटच्या टप्प्यात अधिकच वेग घेतला असून, हवामान आणि राजकारण यांची ही अनोखी सांगड शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT