E-KYC ration card : जिल्ह्यातील साडे चार लाख लाभार्थीची ई- केवायसी बाकी File Photo
छत्रपती संभाजीनगर

E-KYC ration card : जिल्ह्यातील साडे चार लाख लाभार्थीची ई- केवायसी बाकी

रेशन : तांत्रिक अडचणींमुळे कार्डधारक, दुकानदारांची डोकेदुखी वाढली

पुढारी वृत्तसेवा

E-KYC of four and a half lakh beneficiaries in the district is pending.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात सहा महिन्यांपासून रेशन कार्डधारकांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु अजूनही जिल्ह्यातील २० टक्के म्हणजे ४ लाख ७१ हजार ६३० लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. तांत्रिक अडचणी येत असल्याने लाभार्थी आणि दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे.

जिल्ह्यात २३ लाख ९९ हजार रेशन कार्ड सदस्य आहेत. या सदस्यांच्या पडताळणीसाठी राज्य शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. यापैकी १२ लाख ३१ हजार सदस्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तर ६ लाख ८३ हजार ९७ जणांची ई-केवायसी निरीक्षकांच्या लॉगिंगला पेंडिग आहे. १३ हजार ४२१ जणांची ई-केवायसी रिजेक्ट करण्यात आली आहे. अशा प्रमाणे १९ लाख २७ हजार ८६० सदस्यांच्या ई-केवायसीबाबत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप ४ लाख ७१ हजार ६३० जणांची ई-केवायसी बाकी आहे.

ई-केवायसी प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे अन्नधान्य वितरण विभाग छत्रपती संभाजीनगर, पैठण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि वैजापूर तालुक्यांमध्ये आढळून आली आहेत. पैठण तालुक्यात तब्बल २७ टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.

त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (२२ टक्के), वैजापूर (२२ टक्के) आणि अन्नधान्य वितारण अधिकारी कार्यालय (१८ टक्के) ई-केवायसीचे काम बाकी आहे. दुसरीकडे वारंवार सर्व्हर डाऊन असल्याने लाभार्थी आणि दुकानदार वैतागले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून केवायसी प्रक्रिया करताना सव्र्व्हर डाऊनचा संदेश सातत्याने येत असल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.

१५ ऑगस्ट डेडलाईन

ई-केवायसीसाठी शासनाने अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र, आता १५ ऑगस्ट ही डेडलाईन असून यापूर्वी शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. अन्यथा १५ ऑगस्टनंतर रेशनवरील धान्य मिळणे बंद केले जाणार आहे. तसेच अशा शिधापत्रिकाही रद्द केल्या जाणार आहेत.
- प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT