Ajanta Caves : अजिंठा लेणी सलग सुट्यांमुळे दररोज हाऊसफुल्ल File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ajanta Caves : अजिंठा लेणी सलग सुट्यांमुळे दररोज हाऊसफुल्ल

चार दिवसांत २९ हजार ५५३ पर्यटकांची भेट, पर्यटनाला सुगीचे दिवस

पुढारी वृत्तसेवा

Due to consecutive holidays, the Ajanta Caves are packed with tourists every day

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत, वाघूर नदीच्या अर्धचंद्राकृती वळणावर कोरलेली अजिंठा लेणी ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जगप्रसिद्ध ओळख आहे. निसर्गसौंदर्य, प्राचीन इतिहास आणि बौद्धकलेचा अमूल्य ठेवा यांचा संगम असलेल्या या जागतिक वारसा स्थळाला यंदाच्या पर्यटन हंगामात देश-विदेशातील पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे.

नाताळाच्या सुट्ट्यांमुळे मागील चार दिवसांपासून अजिंठा लेणी दररोज हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चार दिवसांत तब्बल २९ हजार ५५३ पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली.

परिणामी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, एसटी महामंडळ तसेच भारतीय पुरातत्त्व विभागाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पर्यटन महामंडळाच्या पर्यटक निवासस्थानासह परिसरातील खासगी हॉटेल्स व लॉजिंग पूर्णतः बुक झाल्याने अजिंठा लेणीतील पर्यटनाला सध्या सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. २९ हजार ५५३ पर्यटकांची विक्रमी उपस्थिती दरवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पर्यटक संख्येत काहीशी घट जाणवत असली तरी नाताळाच्या सुट्ट्यांमुळे गुरुवारपासून अजिंठा लेणी दररोज हाऊसफुल्ल होत आहे.

गुरुवारी ५ हजार ११६, शुक्रवारी ७हजार ३४, शनिवारी ८ हजार ५६ तर रविवारी ९ हजार ३४७ पर्यटकांनी लेणींची सफर केली. सलग चारही दिवस पर्यटन महामंडळाचे दोन्ही वाहनतळ दुपारी बारा वाजेपर्यंतच पूर्ण भरल्याने दुपार नंतर अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांना त्यांची वाहने अजिंठा घाटाखालील छत्रपती संभाजीनगरड्डजळगाव राष्ट्रीय महामार्गालगत उभे करावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.

एसटीची भक्कम व्यवस्था

मंगळवारी अपुऱ्या बस संख्येमुळे पर्यटकांना तिकीट मिळविण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या होत्या. या गैरसोयीबाबत बुधवारी (दि. २४) दैनिक पुढारीने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच एसटी प्रशासनाने या वृत्ताची तत्काळ दखल घेतली.

सोयगाव आगाराने बुधवारी २२ बसेस उपलब्ध करून दिल्या, तर गुरुवार ते रविवार या सलग चार दिवसांत २० बसेस, १४ वाहक, २० चालक, ३ वाहतूक नियंत्रक, २ तिकीट निरीक्षक आणि १ चेकिंग लाईन वाहन अशा एकूण ४० कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पथक अजिंठा लेणीत तैनात केले. या व्यवस्थेमुळे फर्दापूर टी-पॉइंट ते अजिंठा लेणी दरम्यानची पर्यटक वाहतूक मागील पाच दिवसांपासून सुरळीत सुरू असून पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाढती गर्दी, सुरळीत वाहतूक आणि पूर्ण क्षमतेने सुरू असलेली पर्यटन यंत्रणा यामुळे अजिंठा लेणी परिसर सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT