Municipal Election : महापालिका निवडणुकीत 'तारीख पे तारीख'चा खेळ File Photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal Election : महापालिका निवडणुकीत 'तारीख पे तारीख'चा खेळ

प्रारूप मतदार याद्या २० नोव्हेंबरला होणार जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Draft voter lists for municipal elections to be announced on November 20

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असला तरी मतदार याद्यांच्या घो-षणेची प्रतीक्षा मात्र अद्याप संपलेली नाही. निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलत आता २० नोव्हेंबर ही प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्याची नवी तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे तारीख पे तारीख असा खेळ सुरू असल्याचा सूर नागरिक आणि राजकीय वर्तुळातून ऐकू येत आहे.

महापालिकेचा कार्यकाळ संपून प्रशासकांच्या अधिपत्याखाली कारभार सुरू आहे. निवडणुकीची चाहूल लागल्याने शहरात राजकीय तापमान वाढले असून, आयोगानेही तयारीचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले.

सुरुवातीला ४ नोव्हेंबर रोजी याद्या जाहीर होणार होत्या; मात्र तांत्रिक कारणामुळे ही तारीख पुढे ढकलून १४ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली. परंतु काही प्रभागांतील सुध ारणा आणि तपासणीसाठी वेळ लागल्याने आता २० नोव्हेंबर ही नव्याने जाहीर तारीख ठरवण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने प्रारूप मतदार याद्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केल्या आहेत.

ऑनलाईन तपासता येणार मतदान केंद्र

नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने आपले नाव, घर क्रमांक आणि मतदान केंद्र तपासता येईल. आयोगाच्या सूचनांनुसार प्रारूप याद्यांवर हरकती आणि सूचना नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, मतदार याद्यांवरील हालचालींमुळे शहरातील राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. प्रभागनिहाय मतदारसंख्या, सामाजिक समीकरणे आणि केंद्रावर आकडेवारीचा अभ्यास करून उमेदवार निवडीची तयारी सुरू आहे.

काउंटडाउन सुरू

प्रारूप मतदार याद्या २० नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर काही दिवस हरकती व दुरुस्त्यांचा कालावधी ठेवला जाणार असून, त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे निवडणुकीचा काउंटडाउन सुरू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT