Sambhajinagar news : नगरसूल-तारूर मार्गाचे दुहेरीकरण काही गाड्या रद्द file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar news : नगरसूल-तारूर मार्गाचे दुहेरीकरण काही गाड्या रद्द

काही अंशतः रद्द : काही उशिराने धावणार रेल्वे प्रशासनाची माहिती.

पुढारी वृत्तसेवा

Doubling of the Nagarsul-Tarur line; some trains cancelled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नगरसूल-तारूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामध्ये विद्युतीकरण व सिग्नलिंगची कामेही करण्यात येणार आहेत. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत १६ दिवसांचा ब्लॉक मंजूर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या फेऱ्यात बदल करण्यात येत आहे.

यात जालना-नगरसूल व नगरसूल - जालना पॅसेंजर १, ३, ७, ८ व १० डिसेंबर रोजी रद्द केली आहे. जालना-नगरसूल डेमू व नगसूल जालना डेमू २, ४, ५, ६ व ९ डिसेंबर रोजी रद्द केली आहे. काही गाड्या अंशतः रद्द चेन्नई-नगरसूल ६ डिसेंबर रोजी रोटेगाव-नगरसूल तर नगरसूल-चेन्नई ७ डिसेंबर रोजी नगरसूल-रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

नरसापूर-नगरसूल ४ व ६ डिसेंबर रोजी रोटेगाव-नगरसूल तर नगरसूल-नरसापूर ५ व ७ डिसेंबर रोजी नगरसूल-रोटेगाव त्याचबरोबर नरसापूर-नगरसूल ३० नोव्हेंबर आणि १ ते ५ व ७ ते ९ डिसेंबर रोजी रोटेगाव-नगरसूल तर नगरसूल-नरसापूर १ते४ व६,८,९, १० डिसेंबर रोजी नगरसूल-रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द केली आहे.

मनमाड-धर्माबाद १ ते १० डिसेंबर रोजी मनमाड-लासूर, तर धर्माबाद-मनमाड १ ते १० डिसेंबर रोजी लासूर-मनमाड दरम्यान अंशतः रद्द केली आहे. मनमाड-नांदेड ९ व १० डिसेंबर रोजी मनमाड-लासूर, नांदेड-मनमाड ८ व ९ डिसेंबर रोजी लासूर- मनमाड दरम्यान अंशतः रद्द केली. काचीगुडा-नगरसूल ३ ते ९ डिसेंबर रोजी रोटेगाव-नगरसूल, नगरसूल-काचीगुडा ४ ते १० डिसेंबर रोजी नगरसूल-रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द केली.

काही गाड्या उशिरा

नांदेड-निझामुद्दीन १ व ८ डिसेंबरला ८० मिनिटे, नांदेड-अमृतसर १ ते १० डिसेंबर रोजी ७० मिनिटे तर नांदेड- मुंबई १ ते १० डिसेंबर रोजी ७० मिनिटे उशिराने धावणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT