Sambhajinagar News : शेतकऱ्यांचा अंत पाहू नका; सरसकट कर्जमाफी द्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शेतकऱ्यांचा अंत पाहू नका; सरसकट कर्जमाफी द्या

संघर्ष शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

Do not test the farmers' patience; grant a blanket loan waiver

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ११) पिसादेवी येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. नापिकी, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून, शासनाने अटी-शर्तीशिवाय विक्री बंद करून ऑफलाइन पद्धत सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब भूमे, जिल्हाध्यक्ष उदयराज गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मोरे पाटील, राहुल मते पाटील, रोहिदास फुलमाळी, राम नवघरे पाटील, सतीश बोरसे पाटील, दीपक नारळे, विष्णू काळे, योगेश शिंदे, बाळासाहेब साबळे, रूपाली काळे, शुभम देशमुख, अनिकेत साठे आणि रुची

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT