

Congress party aggressive on fuel shortage issue
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : डिझेल-पेट्रोल व घरगुती गॅसची टंचाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली लूट तसेच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ गंगापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी (दि. २७) तहसीलदार नवनाथ वागवाड निवेदन देण्यात आले. मागण्यांवर सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन, रास्ता रोको आणि तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड पाटील यांनी दिला.
तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल व घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेती मशागतीची कामे सुरू असताना डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच गॅस सिलिंडरसाठी महिलांना त्रास सहन करावा लागत असून, काळाबाजार वाढल्याचा आरोप करण्यात आला.
सर्व पेट्रोल पंपांवर तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची तसेच गॅस एजन्सींवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. शासकीय कांदा खरेदी केंद्रे संथ गतीने सुरू असून, काही केंद्र बंद असल्याने व्यापारी कवडीमोल दरात कांदा खरेदी करत असल्याचा आरोप करण्यात आला.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरूनही काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला. प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्च देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करू एनटीए संस्था बरखास्त करावी तस् दोषींवर कठोर कारवाई करावी, अ मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल यावेळी माजी नगराध्यक्ष मोहस चाऊस, नईमभाई मन्सूरी, बद्रीन बारहाते, विलास आबा पव ज्ञानेश्वर वाघचौरे, सागर दळव सुभाष बनकर, अनिल खवत नानाभाऊ सोनवणे, नंदकिशोर बागव रिचार्ड बत्तीसे, शौकत शेख, भागिन कांबळे, रफिकभाई पठाण, बादश पटेल, समीरभाई शेख, अज गायकवाड, मन्नुभाई शेख, भगव सुखधान, अजिजभाई शेख, गोरखन पाटील बोडखे, मकसूद शेट मोहनराव खंडागळे, लतीफभाई शेट किशोर पवार, सिद्धार्थ गायकवाड, क शेलार, परवेझ पठाण, अनंता कुमाव कैलास खाजेकर, रमेश फोला यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.