MSRTC : एसटीला दिवाळी पावली : १६ कोटी ५२ लाखांचे उत्पन्न File Photo
छत्रपती संभाजीनगर

MSRTC : एसटीला दिवाळी पावली : १६ कोटी ५२ लाखांचे उत्पन्न

गतवर्षीच्या तुलनेत एक कोटी ५६ लाख जास्तीचे उत्पन्न

पुढारी वृत्तसेवा

Diwali celebrated for ST: Income of Rs 16.52 crore

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीने दिवाळी हंगामात केलेले जादा गाड्यांचे नियोजन तसेच चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नाच्या सातत्यामुळे दिवाळीत तब्बल १६ कोटी ५२ लाख २२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. हे उत्पन्न गतर्षीच्या तुलनेत १ कोटी ५६ लाख ५६ हजार रुपये इतके असल्याची माहिती एसटीच्या वतीने देण्यात आली.

दिवाळीनिमित्त १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान जादा गाड्यांसह इतर बस विविध मार्गांवर सोडण्याचे नियोजन केले होते. या नियोजनात चालक, वाहकांचा मोठा हाथ आहे. प्रवाशांना वेळेवर व दर्जेदार सेवा देण्यात ते सक्रीय राहिले. दिवाळीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागातून ५३० बस बसेसनी प्रवाशांना सेवा दिली.

या ३१ लाख ६ हजार किलोमीटरचे अंतर कापत १७ लाख ८० हजार ३३२ प्रवाशांना सेवा दिली. या सेवेतून १६ कोटी ५२ लाख २२ हजारांचे उत्पन्न मिळवले. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत १ कोटी ५६ लाख ५६ हजार रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले. या वर्षी प्रति किलोमीटर ५३ रुपये १९ पैसे उत्पन्न मिळाले.

गतवर्षी दिवाळीत एसटीने ५१६ बस विविध मार्गावर चालवल्या. या बस २९ लाख ६८ हजार किलोमीटर अंतर पार करत १७ लाख १० हजार ९५७ प्रवाशांना सेवा दिली. यातून १४ कोटी ९५ लाख ६६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. प्रति किलोमीटर उत्पन्न ५० रुपये ३९ पैसे होते.

हंगामी दरवाढ रद्द

एसटीने दिवाळीत होणारी हंगामी दरवाढ रद्द केली. त्यामुळे या दिवाळीत एसटीला आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती. असे असूनही चालक, वाहक, अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नांने वेळेचे नियोजन आणि गाड्याची उपलब्धता यामुळे दिवाळी हंगामात चांगले उत्पन्न मिळवण्यात एसटीला यश मिळाले. यात सर्वांचा महत्वाचा वाटा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT