Sambhajinagar Crime News : हॉटेल हयातमध्ये घटस्फोटित पत्नीला पतीची मारहाण File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : हॉटेल हयातमध्ये घटस्फोटित पत्नीला पतीची मारहाण

चिकलठाणा भागातील पंचतारांकित हयात हॉटेलमध्ये एका महिलेला तिच्या घटस्फोटित पतीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

पुढारी वृत्तसेवा

Divorced wife beaten by husband in Hotel Hyatt

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

चिकलठाणा भागातील पंचतारांकित हयात हॉटेलमध्ये एका महिलेला तिच्या घटस्फोटित पतीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिचे १ लाख ७० हजार रुपये किमतीचे दोन आयफोन चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि.३१) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. शेख इरशाद (रा. हिमायत बाग) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय महिला या खासगी कामानिमित्त ३१ जानेवारी रोजी दुपारी चिकलठाणा येथील हयात हॉटेलमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांच्या कंपनीचे कदम यांनी रूम नंबर २०२ बुक केली होती. कदम हे नोकरी देण्यासाठी खाली थांबलेले असताना सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांचा घटस्फोटित पती शेख ईरशाद (रा. हिमायत बाग) हा हॉटेलमध्ये आला. तेव्हा रिसे प्शनवरून पीडितेला कॉल आला, तुम्हाला भेटायला जमीर नावाचा व्यक्ती आला आहे, असे सांगितले.

महिलेने ओळखीचा असल्याने पाठवा, असे सांगितले. दरवाजा वाजल्यानंतर त्यांनी दुर्बिणीमधून पाहिले तर बाहेर जमीर नसून इरशाद असल्याचे दिसले. त्याच्याशी त्यांचा घटस्फोट झालेले आहे. महिलेने तात्काळ कदम यांना फोन करून माहिती दिली. कदम यांनी लॉबीमध्ये थांबलेले जमीर आणि पल्लवी यांना रूमकडे पाठवले. मात्र तोपर्यंत हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याच्या मदतीने जबरदस्तीने रूमचा दरवाजा उघडून इरशाद आत शिरला. रूममध्ये प्रवेश करताच आरोपी शेख ईरशादने पीडितेला शिवीगाळ करून मारहाण केली.

जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरडाओरड झाल्याने तिथे उपस्थित अस-लेले इतर लोक मदतीला आले आणि पीडिता रूमच्या बाहेर पडल्या. या गोंधळाचा फायदा घेत आरोपीने रूममध्ये ठेवलेले १ लाख रुपये किमतीचे दोन आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन १६ प्रो मॅक्स असे चोरून नेले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT