प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar ZP Election Results : कन्नडच्या नागद गटाने राखली काँग्रेसची शान

तृप्ती राजपूत यांचा विजय, तर माजी आमदरांच्या पत्नीचा पराजय

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात जिल्ह्यात भाजप-शिवसेना आघाडीवर असताना काँग्रेस पक्षाचा एकमेव विजय नागद गटातून मिळाला आहे. नागद गटाच्या काँग्रेस उमेदवार तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांनी 6,473 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. तर उबाठा गटाचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पत्नी पूनम राजपूत यांना केवळ 2,691 मते मिळाली असून, त्या पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.

नागद गटाची निवडणूक लढण्यासाठी डॉ. दिलीपसिंग राजपूत व तृप्तीताई राजपूत हे गेल्या पाच वर्षांपासून शिवसेना पक्षाकडून तयारी करत होते. या कालावधीत त्यांनी नागद गटात सामाजिक कार्यातून आपला जनसंपर्क वाढवला होता. अनेक नागरिकांच्या समस्या त्यांनी स्वखर्चातून सोडवून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता.मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ऐनवेळी शिवसेनेने त्यांची उमेदवारी कापून भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तमराव राठोड यांच्या पत्नी चंद्रकलाबाई राठोड यांना उमेदवारी दिली.

अचानक उमेदवारी कापली गेल्याने दिलीपसिंग राजपूत यांच्या जिव्हेरी लागले. त्यानंतर त्यांनी माजी आमदार नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग््रेास पक्षाची उमेदवारी स्वीकारत पत्नी तृप्ती यांना निवडणूक रिंगणात उतरवले. नागद गटात प्रभावी प्रचार यंत्रणा उभारून त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. या कामाची दखल घेत मतदारांनी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप-पुरस्कृत व उबाठा उमेदवारांना नाकारून तृप्तीताई राजपूत यांना निवडून दिले.

जिल्ह्यात काँग््रेास पक्षाच्या एकमेव सदस्या म्हणून निवडून आल्याने तालुक्यातच नव्हे तर जिल्हात नागद गटाचे महत्त्व वाढले असून तालुक्यात राजपूत दाम्पत्याच्या राजकीय नियोजनाची जोरदार चर्चा सुरू आहे.नागरिकांशी असलेला जनसंपर्क आणि त्यांनी नागद गटाचा केलेला विकास प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविला. याला मतदारांनी सुध्दा प्रतीसाद देत तृप्ती राजपूत यांच्या विजयी केले.

कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

नागद गटाच्या काँग्रेस उमेदवार तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांनी 6,473 मते मिळवत दणदणीत विजय मिळविल्यानंतर दिलीपसिंग राजपूत यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करून विजयी उत्सव साजरा करत जल्लोष केला.शवसेनेकडून तिकीट कापल्याने राजपूत यांनी काँग्रेसच्या तिकीटावर आपल्या पत्नीला नागद गटातून उभे केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT